“११ वर्षांनंतरही महिला सुरक्षित नाहीत, २०१४ नंतर तर... ”; निर्भयाच्या वडिलांची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2023 12:13 PM2023-12-16T12:13:38+5:302023-12-16T12:13:56+5:30

Nirbhaya Incident:देशाला हादरवून टाकणाऱ्या निर्भया घटनेला आता ११ वर्षे पूर्ण झाली आहेत.

even after 11 years women are not safe said nirbhaya father reaction | “११ वर्षांनंतरही महिला सुरक्षित नाहीत, २०१४ नंतर तर... ”; निर्भयाच्या वडिलांची प्रतिक्रिया

“११ वर्षांनंतरही महिला सुरक्षित नाहीत, २०१४ नंतर तर... ”; निर्भयाच्या वडिलांची प्रतिक्रिया

Nirbhaya Incident: १६ डिसेंबर २०१२ च्या रात्री दिल्लीत घडलेल्या निर्भया प्रकरणामुळे संपूर्ण देश हादरला. या घटनेला आता ११ वर्षे पूर्ण झाली आहेत. या घटनेत जीव गमावलेल्या पीडितेच्या वडिलांनी प्रतिक्रिया दिली आहे. ११ वर्षांनंतरही महिला सुरक्षित नसल्याचे मत त्यांनी मांडले आहे.

२०१४ पासून बर्‍याच गोष्टी बदलल्या आहेत. अनेक वंचितांना लाभ झाला आहे. आपण असेही म्हणू शकतो की, एक प्रकारे सामाजिक आणि धार्मिक क्रांती झाली आहे. तथापि, २०१२ नंतर जे बदलले नाही ते म्हणजे महिलांची सुरक्षा. आजही आपल्या देशात महिला अत्यंत असुरक्षित आहेत, असे स्पष्ट मत निर्भया वडिलांनी व्यक्त केले आहे. 

सरकारी वकिलांपेक्षा खाजगी वकील अधिक सरस

पोलीस एफआयआर नोंदवत नाहीत किंवा पुरावे योग्य प्रकारे सादर करत नाहीत. खूप पैसे असलेल्या गुन्हेगारांकडून खासगी वकिलांना पाचारण केले जाते. सरकारी वकिलांपेक्षा खासगी वकील अधिक सरस ठरतात, असे दोन महत्त्वाचे मुद्दे निर्भयाच्या वडिलांनी सांगितले. या देशात कुणाच्या मुलीला किंवा पत्नीबाबत काही झाले तर आणि मदत करायला जायचे असेल तर कुठेही निश्चिती नाही, असेही ते म्हणाले. 

दरम्यान, काही आकड्यांनुसार, २०२२ मध्ये महिलांच्या संदर्भात १४,१५८ हून अधिक गुन्ह्यांची नोंद झाली. २०२१ मध्ये १३,९८२ गुन्ह्यांची नोंद झाली. २०२० मध्ये हा आकडा ९,७८२ इतका होता, जो त्या वर्षीच्या इतर महानगरांच्या तुलनेत सर्वाधिक होता. २०२२ मध्ये अपहरणाचे ३,९०९ गुन्हे आणि बलात्काराच्या १,२०४ घटनांची नोंद झाली.
 

Web Title: even after 11 years women are not safe said nirbhaya father reaction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.