शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

भारतात ईव्ही क्रांती: यूपीने महाराष्ट्र, दिल्लीला मागे टाकले; आर्थिक परिस्थितीला देणार आकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2025 13:01 IST

२०१३ पासून ५१.५० लाखांहून अधिक ईव्ही नोंदणीकृत

हरीश गुप्ता, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: हे आश्चर्यकारक वाटेल, पण खरे आहे. १०.८४ लाख नोंदणीकृत ईव्हीसह उत्तर प्रदेश इलेक्ट्रिक वाहन क्रांतीमध्ये आघाडीवर आहे. त्यानंतर महाराष्ट्र (५,५२,००२), कर्नाटक (४,४४,८१६), दिल्ली (३,४६,९४९), बिहार (३,२४,८७५) आणि तामिळनाडू (३,१०,६२४) यांचा क्रमांक लागतो.

योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकार राज्याच्या २०२२ च्या इलेक्ट्रिक वाहन धोरणाला याचे श्रेय देते. यामुळे ३०,००० कोटी रुपयांची गुंतवणूक आकर्षित झाली आहे, तर ८ लाख नोकऱ्या निर्माण केल्या आहेत, विशेषत: ई-रिक्षा उत्पादनाद्वारे.

उत्तर प्रदेश आणि बिहारसारख्या राज्यांनी उत्पन्नाचा परवडणारा स्रोत म्हणून ई-रिक्षांचा मोठ्या प्रमाणात स्वीकार केला आहे, तर दिल्ली आणि बंगळुरूसारखी शहरे स्वतंत्र लेन आणि सार्वजनिक चार्जिंग स्टेशनसारख्या ईव्ही पायाभूत सुविधांना प्रोत्साहन देत आहेत. 

ईव्ही वाहन क्षेत्रातील आकडेवारीनुसार, २५,०६,५४५ वाहनांसह (एकूण ईव्हीच्या ४८.६२%) दुचाकी वाहनांचे वर्चस्व आहे. त्यानंतर तीनचाकी वाहने (२३,९७,२६४) आणि चारचाकी वाहने (२,२४,४५९) यात बस (१०,०८८) आणि इतर (१६,०१५) आहेत. ई-रिक्षा विशेषतः उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये मोठ्या प्रमाणात आहेत. भारतातील ३३,००० सार्वजनिक चार्जर जागतिक मापदंडापेक्षा मागे आहेत. चार्जर-टू-व्हेइकल प्रमाण प्रति चार्जर १३५ ईव्ही आहे.

ईव्हीला प्रोत्साहन

महाराष्ट्राने अधिसूचित केलेल्या इलेक्ट्रिक व्हेईकल (ईव्ही) धोरण २०२५ द्वारे ईव्हीला प्रोत्साहन देण्यात येत आहे. या माध्यमातून १,९९३ कोटी रुपयांच्या निधीचे केले आहे. मागील ९३० कोटी रुपयांच्या बजेटपेक्षा ही रक्कम दुप्पट आहे. २०३० पर्यंत ईव्हीचा वापर ३०% ने वाढवण्याचे उद्दिष्ट आहे.

२०१३ पासून ५१.५० लाखांहून अधिक ईव्ही नोंदणीकृत

२०१३ पासून ५१.५० लाखाहून अधिक ईव्ही नोंदणीकृत होऊन भारतातील इलेक्ट्रिक वाहन (ईव्ही) क्रांतीने एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे; परंतु या वाढीमुळे प्रादेशिक असमानता, आर्थिक प्राधान्ये आणि पर्यावरणीय वचनबद्धतेवर तीव्र राजकीय वादविवाद सुरू झाला आहे. पायाभूत सुविधांमधील तफावत आणि बॅटरी रिसायकलिंगसारखी आव्हाने कायम असताना भारताचा ईव्ही स्वीकारण्याचा वेग वाढत आहे. बॅटरीच्या किमती कमी होत असताना आणि उत्सर्जन नियम कडक होत असताना, ईव्हीची भरभराट भारताच्या आर्थिक आणि राजकीय परिस्थितीला पुन्हा आकार देण्यास सज्ज आहे. 

टॅग्स :Electric Carइलेक्ट्रिक कारelectric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटर