हापूसची युरोपवारी पक्की
By Admin | Updated: January 21, 2015 02:17 IST2015-01-21T02:17:48+5:302015-01-21T02:17:48+5:30
भारतातून आंबा आयात करण्यावर घातलेली बंदी उठविण्याचा निर्णय युरोपीय संघटनेने मंगळवारी घेतल्याने ‘हापूस’ या कोकणच्या राजाला २९ युरोपियन देशांची बाजारपेठ पुन्हा खुली होणार आहे.

हापूसची युरोपवारी पक्की
सात महिन्यांनी उघडले निर्यातीचे दार : भाजीपाल्यावरील प्रतिबंध मात्र कायम
लंडन : भारतातून आंबा आयात करण्यावर घातलेली बंदी उठविण्याचा निर्णय युरोपीय संघटनेने मंगळवारी घेतल्याने ‘हापूस’ या कोकणच्या राजाला २९ युरोपियन देशांची बाजारपेठ पुन्हा खुली होणार आहे.
फळबागांवरील कीड आणि रोग प्रतिबंधाचे प्रभावी उपाय भारतात योजण्यात येत असल्याची खात्री पटल्यावर आंब्यावरील आयातबंदी उठविण्याची शिफारस युरोपियन युनियनच्या संबंधित तज्ज्ञ समितीने केली. युरोपियन कमिशन या सामायिक युरोपीय बाजारपेठेच्या सर्वोच्च संस्थेने शिक्कामोर्तब केल्यानंतर येत्या मार्चपासून सुरू होणाऱ्या हंगामात भारतीय आंबे युरोपच्या बाजारांत आयात करण्यास सुरुवात होऊ शकेल, असे युरोपियन युनियनने एका अधिकृत पत्रकान्वये जाहीर केले. (वृत्तसंस्था)
ब्रिटनने घेतला पुढाकार
भारताच्या फळे आणि भाजीपाल्याच्या निर्यातीत युरोपचा वाटा ५० टक्क्यांहून अधिक आहे. आंब्यावरील आयात बंदी उठावी, यासाठी ब्रिटनने विशेष प्रयत्न केले होते. साहजिकच ब्रिटनचे भारतातील उच्चायुक्त जेम्स बेवन यांनी या निर्णयाचे स्वागत केले.
का आणि कुठपर्यंत होती बंदी ?
1भारतातून पाठविल्या गेलेल्या आंब्यांना तसेच कार्ली, पडवळ आणि वांगी यासारख्या काही भाज्यांना कीड आणि अळ््यांचा प्रादुर्भाव झाल्याचे निदर्शनास आले होते, त्यामुळे बंदी होती.
2ही बंदी डिसेंबर २०१५ पर्यंत लागू होती. फेरआढाव्यानंतर आंबाबंदी उठवली. परंतु भाजीपाल्याबाबत नंतर विचार केला जाणार आहे.