शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

युरोपियन युनियनचं शिष्टमंडळ उद्या काश्मीरला भेट देणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2019 15:11 IST

कलम 370 रद्द केल्यानंतर पहिल्यांदाच परदेशी शिष्टमंडळ जम्मू-काश्मीरचा दौरा करणार

नवी दिल्ली: युरोपियन युनियनच्या शिष्टमंडळानं आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची भेट घेतली. या बैठकीत जम्मू-काश्मीरमधील परिस्थितीबद्दल चर्चा झाली. युरोपियन युनियनचं शिष्टमंडळ उद्या जम्मू-काश्मीरचा दौरा करेल. 5 ऑगस्टला जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारं कलम 370 हटवण्यात आलं. त्यानंतर पहिल्यांदाच परदेशी शिष्टमंडळ या भागाला भेट देणार आहे. जम्मू-काश्मीरमधून कलम 370 काढल्यानंतर जगभरात हा विषय चर्चेत आला. पाकिस्ताननं अनेकदा जागतिक पातळीवरील महत्त्वाच्या परिषदांमध्ये जम्मू काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला. मात्र सगळ्याच व्यासपीठांवर पाकिस्तानला अपयश आलं. यानंतर आता युरोपियन युनियनचं शिष्टमंडळ जम्मू काश्मीरला भेट देणार आहे. या शिष्टमंडळात 28 सदस्यांचा समावेश आहे. आतापर्यंत भारतानं कोणत्याही परदेशी शिष्टमंडळाला जम्मू काश्मीरमध्ये जाण्याची परवानगी दिली नव्हती. त्यामुळेच युरोपियन युनियनच्या शिष्टमंडळाचा जम्मू काश्मीर दौरा महत्त्वपूर्ण मानला जात आहे. युरोपियन युनियनच्या शिष्टमंडळानं मोदींची भेट घेतल्यानंतर पंतप्रधान कार्यालयाकडून निवेदन प्रसिद्ध करण्यात आलं. जम्मू-काश्मीरसह देशाच्या अनेक भागांचा शिष्टमंडळाकडून केला जाणारा दौरा यशस्वी होईल, असा विश्वास पंतप्रधान कार्यालयानं व्यक्त केला आहे. भारताच्या दौऱ्यादरम्यान शिष्टमंडळाला सांस्कृतिक विविधता आणि विकास कामंदेखील पाहता येतील, असं निवेदनात नमूद करण्यात आलं आहे. एका सामाजिक संस्थेनं युरोपियन युनियनच्या शिष्टमंडळाची जम्मू काश्मीरचा दौरा आयोजित केला आहे. शिष्टमंडळातले बहुतांश सदस्य इटालियन आहेत. 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरArticle 370कलम 370Narendra Modiनरेंद्र मोदीAjit Dovalअजित डोवाल