शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शिष्टाचार सुविधा न्यायमूर्तींचा विशेषाधिकार नाही; सरन्यायाधीशांची नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2023 06:19 IST

सरन्यायाधीश चंद्रचूड यांची नाराजी

नवी दिल्ली : रेल्वे प्रवासादरम्यान अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या एका न्यायमूर्तींच्या सांगण्यावरून त्यांना झालेल्या गैरसोयीबद्दल रेल्वे अधिकाऱ्यांकडून स्पष्टीकरण मागण्यात आले होते. याचा संदर्भ घेत सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी सर्व मुख्य न्यायमूर्तींना पत्र लिहून आपली नाराजी आणि चिंता व्यक्त केली. न्यायमूर्तींसाठी उपलब्ध शिष्टाचार सुविधा अशा प्रकारे वापरल्या जाऊ नयेत, ज्यामुळे इतरांची गैरसोय होऊ शकते किंवा न्यायव्यवस्थेवर सार्वजनिक टीका होऊ शकते, यावर सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी आपल्या पत्रात भर दिला.

अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निबंधक (शिष्टाचार) यांनी १४ जुलै रोजी उत्तर मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापकांना न्यायमूर्तींना झालेल्या गैरसोयीबद्दल विचारणा केल्याचा संदर्भ देत, सरन्यायधीश म्हणाले की, यामुळे साहजिकच न्यायपालिकेत आणि बाहेर अस्वस्थता निर्माण झाली आहे.संबंधितांना ओशाळल्यासारखे वाटू नये म्हणून सरन्यायाधीशांनी पत्रात न्यायमूर्ती किंवा उच्च न्यायालयाच्या नावाचा उल्लेख नसला तरी, उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींना रेल्वे कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाचे अधिकार नसल्याचा दावा करण्यात आला आहे. आपल्या वरिष्ठांना खूश ठेवण्यासाठी उच्च न्यायालयाच्या अधिकाऱ्याला रेल्वे कर्मचाऱ्यांकडून स्पष्टीकरण मागवण्याची गरज नाही, असेही सरन्यायाधीशांनी खडसावले आहे. 

‘न्यायमूर्तींना उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या शिष्टाचार सुविधांचा उपयोग विशेषाधिकाराचा दावा करण्यासाठी केला जाऊ नये, ज्यामुळे त्यांना समाजापासून वेगळे पाहिले जाईल किंवा त्यांच्या शक्ती-अधिकाराचे प्रदर्शन होईल. न्यायिक अधिकाराचा सुयोग्य वापर खंडपीठात असताना आणि बाहेर दोन्ही ठिकाणी न्यायव्यवस्थेची विश्वासार्हता आणि वैधता आणि समाजाचा आपल्या न्यायमूर्तींवर असलेला विश्वास टिकवून ठेवतो,’ असे पत्रात म्हटले आहे.‘मी उच्च न्यायालयांच्या सर्व मुख्य न्यायमूर्तींना माझ्या चिंता उच्च न्यायालयातील सर्व सहकाऱ्यांशी शेअर करण्याची कळकळीची विनंती करत आहे. न्यायव्यवस्थेत आत्मचिंतन आणि समुपदेशन आवश्यक आहे,’ असे पत्रात म्हटले आहे. 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयCourtन्यायालयrailwayरेल्वे