जातीय अत्याचार : आरोपीस जामीन नाकारला
By Admin | Updated: December 16, 2014 23:44 IST2014-12-16T23:44:15+5:302014-12-16T23:44:15+5:30
जातीय अत्याचार : आरोपीचा

जातीय अत्याचार : आरोपीस जामीन नाकारला
ज तीय अत्याचार : आरोपीचाअटकपूर्व जामीन फेटाळलानागपूर : अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश पी. एस. तरारे यांच्या न्यायालयाने जातीय अत्याचारप्रकरणी एका आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला. जयंत सूर्यभान राऊत असे आरोपीचे नाव असून, तो आरोग्यसेवक आहे. प्रथम खबरी अहवालानुसार या प्रकरणाची हकीकत अशी की, महालगाव येथे बालसंगोपन केंद्र आहे. या केंद्रात आरोपी आणि फिर्यादी महिला बॉबी प्रशांत गोंडाणे हे दोघे आरोग्यसेवक आहेत. ८ डिसेंबर २०१४ रोजी सकाळी ९ वाजताच्या सुमारास बॉबी गोंडाणे या पती आणि अन्य आरोग्यसेवक सतीश सोळुंके यांच्यासोबत बालसंगोपन उपकेंद्राच्या आवारात बसल्या असता आरोपीने त्यांच्याकडे पाहून जातीवाचक शिवीगाळ केली. प्राप्त तक्रारीवरून बेला पोलीस ठाण्यात राऊतविरुद्ध ११ डिसेंबर रोजी भादंविच्या ५०६ आणि अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ३(१)(१०) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीने अटक टाळण्यासाठी न्यायालयात धाव घेतली असता, न्यायालयाने त्याचा अर्ज फेटाळून लावला. न्यायालयात सरकारच्या वतीने अतिरिक्त सरकारी वकील अजय निकोसे यांनी काम पाहिले. उपविभागीय पोलीस अधिकारी शीतल वंजारी या तपास अधिकारी आहेत.