ज्येष्ठ नागरिक संघ स्थापन

By Admin | Updated: February 29, 2016 22:01 IST2016-02-29T22:01:41+5:302016-02-29T22:01:41+5:30

हॅलो १ साठी...

Establishment of Senior Citizens Union | ज्येष्ठ नागरिक संघ स्थापन

ज्येष्ठ नागरिक संघ स्थापन

लो १ साठी...
जळगाव- जिल्हा अग्रवाल संघटनेतर्फे अग्रवाल ज्येष्ठ नागरिक संघाची स्थापना अग्रवाल कम्युनिटी हॉलमध्ये स्थापन झाला. एम.एम.अग्रवाल यांची अध्यक्षपदी तर जगदीश अग्रवाल यांची सचिवपदी नियुक्ती झाली. अग्रवाल संघटनेचे अध्यक्ष पवन मित्तल, डॉ.सुरेश अग्रवाल, बनवारीलाल अग्रवाल, सत्यनारायण अग्रवाल, बद्रीप्रसाद अग्रवाल, बजरंगलाल अग्रवाल, चंद्रकांत अग्रवाल, इंदरमल अग्रवाल आदी उपस्थित होते.
रक्तदान शिबिर
जळगाव- तेरापंथ युवक परिषदेतर्फे १ मार्च रोजी अणुव्रत भवन, प्रतापनगर येथे सकाळी ८.३० वाजता रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. प्रांत अभिजीत भांडे, अपर पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, माजी महापौर रमेशदादा जैन आदी उपस्थित राहतील. रक्तदान करण्याचे आवाहन नौरतमल चोरडिया यांनी केले आहे.
मजदूर सेनेचा मोर्चा
जळगाव- राष्ट्रीय मजदूरसेनेतर्फे २ मार्च रोजी भुसावळ येथे प्रांत कार्यालयावर मोर्चा काढला जाईल. १३ रोजी शहरातील पत्रकार भवनात दुपारी २ वाजता मेळावा घेतला जाणार आहे. १६ मार्च रोजी अजिंठा चौफुलीवर जेलभरो आंदोलन केले जाईल, असे जगन सोनवणे व राजू डोंगरदिवे यांनी कळविले आहे.

अर्थसंकल्पीय सभा
जळगाव- जिल्हा परिषदेची अर्थसंकल्पीय सभा १५ ते १८ मार्च या दरम्यान आयोजित करण्याचे नियोजन सुरू आहे. जि.प.चा अर्थसंकल्प यंदा २४ कोटींपर्यंत असेल, असे संकेत अर्थ विभागाने दिले आहेत. आतापर्यंत सर्व विभागांकडून मागणी, नियोजन प्राप्त झाले आहे.


Web Title: Establishment of Senior Citizens Union

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.