१९० जागांसह बिहारमध्ये महागठबंधनच करणार सरकार स्थापन - लालूंचा दावा
By Admin | Updated: November 5, 2015 18:49 IST2015-11-05T18:44:32+5:302015-11-05T18:49:31+5:30
बिहार निवडणूकीत १९० जागा मिळवत महागठबंधनचाच विजय होईल आणि आम्ही सरकार स्थापन करू असा दावा लालू प्रसाद यादव यांनी केला.

१९० जागांसह बिहारमध्ये महागठबंधनच करणार सरकार स्थापन - लालूंचा दावा
>ऑनलाइन लोकमत
पाटणा, दि. ५ - संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या बिहार निवडणूकीत १९० जागा मिळवत महागठबंधनचाच विजय होईल आणि आम्ही सरकार स्थापन करू असा दावा लालू प्रसाद यादव यांनी केला आहे. अत्यंत चुरशीच्या निवडणूकीतील पाचव्या व अखेरच्या टप्प्यातील मतदान आज, गुरूवारी पार पडले. येत्या रविवारी, ८ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार असला तरी राजद नेते लालू प्रसाद यादव यांनी आधीच आपल्या विजयाचे भाकीत वर्तवले आहे.
बिहारी जनतेला शिव्या देणारे आणि माझी 'शैतान' अशी संभावना करणा-या पंतप्रधान नरेंद्र मोदींची लोकांनी चांगलीच दखल घेतली असून देशाच्या पंतप्रधानांची ही वक्तव्ये भाजपाला चांगलीच महागात पडणार आहे, असे सांगत त्यांनी मोदींवर टीका केली. समाजातील गरीब आणि मागसवर्गीयांनी आम्हाला संपूर्ण पाठिंबा दिला असून बिहारमध्ये महागठबंधनचाच विजय होणार असे लालू यादव म्हणाले.
पाचही टप्प्यांत मिळून बिहारमध्ये एकूण ५६.८० टक्के मतदान झाले.