पुरात वाहून गेला

By Admin | Updated: August 14, 2015 22:54 IST2015-08-14T22:54:08+5:302015-08-14T22:54:08+5:30

पुन्हा दोघांची भर

In the eruptions flowed | पुरात वाहून गेला

पुरात वाहून गेला

न्हा दोघांची भर
पुरात वाहून गेले : उमरेड, टाकळघाट येथील घटना
नागपूर : मुसळधार पावसामुळे सर्वच नदीनाल्यांना पूर आला. जिल्ह्यातील सर्वच नदी आणि नाले दुथडी वाहत आहे. पुरातून निघण्याचा प्रयत्न करीत असताना गुरुवारी तीन जण वाहून गेले. त्यात आणखी दोघांची भर पडली.
उमरेड तालुक्यातील हेवती येथील रमेश तुळशीराम डांगाले (५५) हे गुरुवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास दूध विकण्यासाठी उमरेडला येत होते. दरम्यान, उदासा नाल्याला आलेल्या पुरातून पुढे निघण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यात ते वाहून गेले. तेथून काही अंतरावर त्यांचा मृतदेह आढळून आला. याप्रकरणी उमरेड पोलिसांनी नोंद केली.
टाकळघाट येथील कृष्णा नदीला पूर आलेला असताना पूर पाहण्यासाठी गेलेला व्यक्ती पुरात वाहून गेला. ही घटनासुद्धा गुरुवारी सकाळी १० वाजताची आहे. अनिल महागू कोचे (४५, रा. झोपडपट्टी, टाकळघाट) असे मृताचे नाव आहे. तो दारू पिऊन होता. कृष्णा नदीला आलेला पूर पाहण्यासाठी तो इतर नागरिकांप्रमाणे पुलावर गेला. मात्र तोल जाऊन तो पुरात पडला आणि वाहत गेला. त्यातच त्याचा मृत्यू झाला. गुरुवारी विद्यार्थी, शिक्षकासह एक चिमुकला पुरात वाहून गेला. त्यापैकी विद्यार्थी आणि चिमुकल्याचा मृतदेह आढळला. तर शिक्षकाचा मृतदेह अद्यापही खापरखेडा पोलिसांना आढळलेला नाही. (प्रतिनिधी)

Web Title: In the eruptions flowed