युग चांडक खून खटला -- जोड
By Admin | Updated: March 20, 2015 22:40 IST2015-03-20T22:40:14+5:302015-03-20T22:40:14+5:30
स्कूलबॅग माझ्या बसण्याच्या खुर्चीवर ठेवून वडिलाच्या क्लिनिकमध्ये जात असल्याचे त्याने सांगितले होते. त्याने स्कूलबॅग घरी नेण्यास सांगितली होती. त्यानंतर तो स्कूटीवाल्या मुलाकडे गेला होता. युग स्कूटीवर बसला होता. स्कूटीचालक मुलाने स्कार्फ तोंडाला बांधला होता. त्यानंतर ते दोघेही छापरूनगर चौकपरिसराच्या दिशेने निघून गेले होते.

युग चांडक खून खटला -- जोड
स कूलबॅग माझ्या बसण्याच्या खुर्चीवर ठेवून वडिलाच्या क्लिनिकमध्ये जात असल्याचे त्याने सांगितले होते. त्याने स्कूलबॅग घरी नेण्यास सांगितली होती. त्यानंतर तो स्कूटीवाल्या मुलाकडे गेला होता. युग स्कूटीवर बसला होता. स्कूटीचालक मुलाने स्कार्फ तोंडाला बांधला होता. त्यानंतर ते दोघेही छापरूनगर चौकपरिसराच्या दिशेने निघून गेले होते. युगची स्कूलबॅग त्याच्या घरी पोहोचविण्यासाठी गेलो असता सुषमा नावाच्या मोलकरणीने युगबाबत विचारले होते. तिला युग हा क्लिनिकच्या एका कर्मचाऱ्यासोबत गेल्याचे सांगितले होते. काही वेळानंतर चांडक यांचा ड्रायव्हर आला होता. त्याने युगबद्दल चौकशी केली होती. त्यालाही क्लिनिकच्या कर्मचाऱ्याने युगला नेल्याचे सांगितले होते. ड्रायव्हरने मोबाईलवरून डॉ. चांडक यांना सांगितले होते. लागलीच चांडक घरी परत आले होते. त्यांच्या पत्नीही घाई गडबडीने घरी परत आल्या होत्या. त्यांना आपण सर्वकाही सांगितले होते. सायंकाळी ६ वाजता पोलीस आले होते. त्यांनाही आपण याबाबत सांगितले होते. २० दिवसानंतर आपणास पोलिसांनी नोटीस देऊन कारागृहात आरोपीच्या ओळखपरेडसाठी बोलावले होते. २५ सप्टेंबर रोजी मी नागपूर मध्यवर्ती कारागृहात गेलो होतो. सात जणांना एका रांगेत उभे ठेवून आपणास घटनेच्या दिवशी जांभळ्या रंगाच्या स्कूटीने गुरु वंदना अपार्टमेंट येथे येऊन युगचे अपहरण करणाऱ्यास ओळखण्यास सांगण्यात आले होते. रांगेत चौथ्या क्रमांकावर उभ्या असलेल्या मुलास ओळखले होते. अधिकाऱ्याने या मुलास त्याचे नाव विचारले असता त्याने अरविंद सिंग, असे सांगितले होते. या साक्षीदाराने न्यायालयात बसून असलेल्या दुसऱ्या क्रमांकाचा आरोपी अरविंद सिंगला ओळखले. युगचे अपहरण करणारा हाच तो आरोपी आहे, असे त्याने सांगितले. त्याने युगचे छायाचित्रही ओळखले. न्यायालयात या साक्षीदाराची उलटतपासणी बाचाव पक्षाचे वकील ॲड. प्रदीप अग्रवाल आणि ॲड. मनमोहन उपाध्याय यांनी घेतली. न्यायालयात फिर्यादी डॉ. चांडक यांचे वकील ॲड. राजेंद्र डागा, बचाव पक्षाच्या वकिलांचे सहाय्यक ॲड. राजेश्री वासनिक, ॲड. प्रमोद उपाध्याय उपस्थित होते. आज संगणक तज्ज्ञ हितेश राठोड यांची उलटतपासणी साक्ष बचाव पक्षाकडून घेण्यात आली. आता या खटल्याची सुनावणी ८ एप्रिलपासून होईल.