शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
7
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
8
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
9
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
10
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
11
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
12
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
13
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
14
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
15
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
16
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
17
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
18
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
19
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
20
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या

ईपीएफधारकांना व्याजापोटी मिळणार ५४ हजार कोटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2019 01:56 IST

व्याजदर ८.६५ टक्के; मिस कॉल, एसएमएसद्वारे मिळणार माहिती

नवी दिल्ली : कामगार भविष्य निर्वाह निधीच्या (ईपीएफ) ६ कोटी लाभधारकांच्या खात्यांत मिळून २०१८-१९ या वर्षासाठी ८.६५ टक्के दराने व्याजापोटी लवकरच ५४ हजार कोटी रुपये जमा होणार आहे. या आर्थिक वर्षात ज्यांचा ईपीएफ खात्यावर वळता करायचा आहे, त्यांनाही ८.६५ टक्के व्याज दिले जाईल. याआधी व्याजाचा दर ८.५५ टक्के होता. तो २०१७-१८ साली संमत झाला होता.यापुढे कोणत्याही सभासदाला ईपीएफओला मिस कॉल देऊन वा एसएमएस सेवेद्वारे याची माहिती मिळेल. आपल्या ईपीएफ खात्यात किती शिल्लक आहे, याची माहिती मिळविण्यासाठी ०११-२२९०१४०६ या क्रमांकावर मिस कॉल द्यावा लागेल. संबंधित यंत्रणा तुम्हाला एसएमएसद्वारे आवश्यक ती माहिती पाठवेल. पीएफची किती रक्कम जमा आहे हे जाणून घेण्यासाठी ७७३८२९९८९९ या क्रमांकावर EPFOHO असा एसएमएस रजिस्टर मोबाइल क्रमांकावरून पाठवल्यास पीएफ खात्यातील रकमेची सर्व माहिती तुम्हाला मिळू शकेल. ईपीएफओच्या वेबसाइटवर जाऊन वा उमंग अ‍ॅप डाऊनलोड करून पीएफ खात्यात किती शिल्लक आहे हे पाहाता येईल.उमंग अ‍ॅपद्वारे मोबाइलवर पाहा पीएफ खातेस्मार्टफोनमध्ये उमंग अ‍ॅप इन्स्टॉल करून ईपीएफओ सिलेक्ट कराएम्प्लॉयी सेंट्रिक सर्व्हिसेसवर क्लिक कराईपीएफमधील शिल्लक पाहाण्यासाठी व्ह्यू पासबुकवर क्लिक करायूएएन क्रमांक एन्टर करून गेट ओटीपीवर क्लिक कराओटीपी क्रमांक एन्टर करून लॉगिनवर क्लिक कराकंपनीचा मेम्बर आयडी निवडाईपीएफओ खात्याचे पासबुक तुम्हाला पाहाता येईल. ज्यांनी आपला यूएनएन क्रमांक अ‍ॅक्टिव्हेट केला आहे त्यांनाच आपल्या ईपीएफओ खात्यातील शिल्लक पाहाता येईल.वेबसाइटवर पीएफ खाते पाहणे शक्यwww.epfindia.gov.in या वेबसाइटला जा.स्क्रीनच्या डाव्या बाजूला जाऊन तिथे अवर सर्व्हिसेस टॅबवर क्लिक करा.फॉर एम्लॉईज या पर्यायावर क्लिक करातुमचा यूएएन क्रमांक व पासवर्ड देऊन लॉग इन कराआता तुमच्या खात्यात किती शिल्लक हे पाहू शकाल

टॅग्स :Provident Fundभविष्य निर्वाह निधी