शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

पर्यावरणाची समस्या Climate Justiceशिवाय सोडवता येऊ शकत नाही- मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2018 14:40 IST

संयुक्त राष्ट्रातील सरचिटणीस अँटोनियो ग्युटेरेस यांच्या हस्ते मोदींचा सन्मान करण्यात आला.

नवी दिल्ली- संयुक्त राष्ट्रातील सरचिटणीस अँटोनियो ग्युटेरेस यांच्या हस्ते मोदींचा सन्मान करण्यात आला. पॉलिसी लिडरशीप या कॅटेगिरीतून मोदींना हा पुरस्कार दिला गेला आहे. दिल्लीत हा कार्यक्रम झाला असून, मोदींनी या कार्यक्रमाला संबोधित केलं आहे. मोदी म्हणाले,  भारत हा प्रकृतीला आईच्या रूपात पाहतो. हा आदिवासी, शेतकरी आणि मच्छीमारांचा सन्मान आहे. या सर्वांचं आयुष्य हे प्रकृती नियमानुसारच सुरू आहे. भारतात महिलेचा सन्मान केला जातो. जी झाडांची निगा राखते. पर्यावरणाच्या समस्येचं गांभीर्य जोपर्यंत समजत नाही, तोपर्यंत ती समस्या संपणार नाही. आम्ही प्रकृतीला सजीव मानलं आहे.पर्यावरणाच्या बाबतीत भारताच्या संकल्पनेला आज जगानं स्वीकारलं आहे. पण हे हजारो वर्षांपासून आमच्या जीवनाचा अविभाज्य भाग राहिला आहे. आज आमच्या देशात गरिबांची संख्या कमी होत चालली आहे. दारिद्र्यरेषेखालील लोक वर येत आहेत. पर्यावरण आणि प्रकृतीवर अतिरिक्त दबाव न टाकताही विकास करता येऊ शकतो. त्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. पर्यावरणाची समस्या Climate Justice शिवाय सोडवता येऊ शकत नाही. जगातल्या वेगानं शहरीकरण होणा-या देशांमध्ये भारताचा समावेश झाला आहे. त्यातच शहरी जीवनाला स्मार्ट आणि अनुकूल बनवण्यासाठी बळ मिळतंय.यावेळी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनीही भाषण केलं आहे. सुषमा स्वराज म्हणाल्या, पॅरिस करारातून ज्यावेळी काही विकसित देशांनी बाहेर पडण्याचा निर्णय घेतला असतानाही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पॅरिस करारावर स्वाक्षरी केली आहे. जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हवामान बदलावर एक समिती बनवली होती, त्यावेळी त्यांनी पूर्ण सभेला दोन भागांमध्ये विभागलं होतं.एक बाजूला पर्यावरणवादी तर दुस-या बाजूला विकासवाले आहेत. पर्यावरणवाद्यांनी प्रकृतीला नुकसान पोहोचवणा-या विकासाला विरोध केला आहे. मोदींनी सौर ऊर्जेच्या क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती केली आहे. अँटोनिया गुट्येरेस यांनी कार्यक्रमात पर्यावरण रक्षणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ऐतिहासिक पाऊल उचलल्याचं म्हटलं आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी