उद्योजक क्रांती प्रदर्शन आजपासून

By Admin | Updated: February 13, 2015 23:10 IST2015-02-13T23:10:59+5:302015-02-13T23:10:59+5:30

(८ बाय २)

Entrepreneur Revolution From Today | उद्योजक क्रांती प्रदर्शन आजपासून

उद्योजक क्रांती प्रदर्शन आजपासून

(८
बाय २)
उद्योजक क्रांती प्रदर्शन आजपासून
नागपूर : अखिल भारतीय माळी महासंघ व महाराष्ट्र माळी उद्योजक विकास संघाच्या संयुक्त विद्यमाने १४ आणि १५ फेब्रुवारीला महाराष्ट्र माळी उद्योजक विकास प्रदर्शन व संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन संत सावता महाराज सांस्कृतिक लॉन मानेवाडा बेसा रोड येथे सकाळी १० ते रात्री १० या वेळात सुरू राहील. माळी समाजाचे कारखानदार, वितरक, अधिकृत विक्रेते, उद्योजकांचे उत्पादन, सेवा प्रदर्शन आणि समाजाच्या आर्थिक विकासासाठी या संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. १४ फेब्रुवारीला दुपारी २ वाजता प्रदर्शनाचे उद्घाटन होणार असून १५ फेब्रुवारीला दुपारी ४.३० वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मार्गदर्शन होणार आहे. प्रदर्शन नि:शुल्क असून नागपूरकरांनी प्रदर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन अखिल भारतीय माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष संभाजी पगारे, प्रदेशाध्यक्ष शंकर लिंगे, सरचिटणीस अविनाश ठाकरे, संयोजक निशिकांत भेदे यांनी केले आहे.

Web Title: Entrepreneur Revolution From Today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.