श्री ला घरी नेण्यासाठी बालगोपाळामध्ये उत्साह

By Admin | Updated: September 16, 2015 23:38 IST2015-09-16T23:38:07+5:302015-09-16T23:38:07+5:30

गणेशोत्सवाला गुरुवारी प्रारंभ होत असून श्री ची मूर्ती घरी घेऊन जाण्यासाठी आज शनिवारवाड्याजवळील स्टॉलवर नागरिकांनी सहकुटुंब गर्दी केली होती़ येथे भाविक आपल्या कुटुंबासहीत दुचाकी व चारचाकी वाहने घेऊन गणेशमुर्ती खरेदी करण्यासाठी आलेले होते.

The enthusiasm in Balgopal to take Mr. | श्री ला घरी नेण्यासाठी बालगोपाळामध्ये उत्साह

श्री ला घरी नेण्यासाठी बालगोपाळामध्ये उत्साह

ेशोत्सवाला गुरुवारी प्रारंभ होत असून श्री ची मूर्ती घरी घेऊन जाण्यासाठी आज शनिवारवाड्याजवळील स्टॉलवर नागरिकांनी सहकुटुंब गर्दी केली होती़ येथे भाविक आपल्या कुटुंबासहीत दुचाकी व चारचाकी वाहने घेऊन गणेशमुर्ती खरेदी करण्यासाठी आलेले होते.
तेथील नागरिक रस्त्याच्या कडेला उभ्या नयनरम्य रुपातील बाहुबली आणि जय मल्हार या व्यक्तिमत्वांपासून प्रेरीत झालेल्या गणेशमुर्तीचे खरेदी करण्याकडे भाविकांचा कल असताना पारंपारीक पद्धतीने तयार झालेल्या गणपतींकडे सुद्धा दुर्लक्ष झालेले नाही. कसबा पेठ व शनिवारवाडा परिसरातील विक्रेत्यांच्या म्हणण्यानुसार पारंपारिक पद्धतीने तयार झालेले दगडुशेठ गणपतींनाही भाविकांची चांगली मागणी आहे.
दर वर्षाला प्रसिध्द होणार्‍या चित्रपट तसेच मालिकांचा संदर्भ घेऊन गणेशमुर्ती तयार करण्याची पध्दत तशी जुनीच आहे. बालचिमुकल्यांचा व तरुणांना आकर्षित करुन व्यवसायाची उलाढाल वाढवणे हा या मागचा प्रमुख उद्देश असतो. यावर्षी बाहुबली हा दाक्षिणात्य चित्रपट व जयमल्हार ही मराठी मालिका बरेच गाजले होते. त्यामुळे पुण्याच्या गणेशमुर्ती विक्रेत्यांनी विनंती करुन अशा रुपातले गणेशमुर्ती पेण, कोल्हापुर, नगर या भागातून परंपरेनुसार चालत आलेल्या गणेशमुर्तीही त्यांनी मागवून घेतली पण त्यांना या मुर्तींचा व्यवसाय होईल अशी शाश्वती नव्हती. विक्रेते निजामपुरकर म्हणाले, 'जवळपासचे सर्व मुर्तीविक्रेत्यांनी बाहुबली, जयमल्हार व इतर मुर्ती मागवल्या़ आमचाही सुरुवातीला तोच विचार होता पण नंतर परंपरेने चालत आलेल्या गणेशमुर्ती ठेवण्याचा निर्णय आम्ही घेतला आणि व्यवसायही विश्वास न बसण्यासारखा झाला,' जवळपास अशीच प्रतिक्रिया तेथील अनेक गणेशविक्रेत्यांचा होती.
कसबापेठेत जमलेले भाविक आपल्या घरातील लहानग्यांच्या इच्छेनुसारच गणेशमुर्ती खरेदी करण्यावरच भरत देत होते. बाहुबली, जयमल्हार यांची क्रेझ तर होतीच पण त्याबरोबरच लहानग्यांचे नेहमीच्या सोबतीतले छोटा भीम रुपातील गणेशमुर्तींचा व्यवसायही चांगला होत होता. पारंपारिक मराठी पोषाख व आपापली वाहने घेऊन भाविक गणेशमुर्ती खरेदी करत होते. काही जणांनी तर आपल्या घरातील पाळीव प्राण्यांनाही सोबत घेऊन येण्याचा उत्साह दाखवला. एकंदरीतच ज्या असीम उत्साहाने गणेशोत्सव साजरा करण्यासाठी पुणेकर प्रसिध्द आहेत तो उत्साह यावर्षीही तेवढाच टिकून आहे.
श्रीच्या मूर्तीच्या खरेदीसाठी आलेल्या भाविकांच्या वाहनांमुळे कसबा पेठेतील गल्ली बोळात वाहतूक कोंडी झाली होती़ वाहतूक नियंत्रण करणार्‍या पोलिसांची तारांबळ उडाली होती आणि परिस्थिती त्यांच्याही हाताबाहेर गेली होती़ मात्र, त्याही स्थितीत गणेशमूर्ती घेऊन जाणार्‍यांनी गणपती बाप्पा असा आवाज दिल्यावर मोरया म्हणत त्यांना प्रतिसाद दिला जात होता़
़़़़़़़़़
शाडुच्या मूर्तींची तितकीशी चलती नसते़ त्याबरोबर शाडुच्या मूर्तींना वेळ व खर्चही जास्त लागतो़ त्याप्रमाणाने मोबदला मिळत नसल्याची खंत विक्रेते विनायक कुंभार यांनी व्यक्त केली़ दुष्काळाचा परिणाम गणेशमूर्तीच्या किंमतीवरही झाला असून किंमतीत ३० टक्के वाढ झाली असल्याचे विक्रेते राहुल कुंभार यांनी सांगितले़

Web Title: The enthusiasm in Balgopal to take Mr.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.