‘आम्ही दोघी’तून घडले मनोरंजन अन् प्रबोधन लोकमत सखी मंच: आर्ट ऑफ लिव्हिंग यांच्या संयुक्त उपक्रमाला प्रतिसाद
By Admin | Updated: September 14, 2015 00:39 IST2015-09-14T00:39:05+5:302015-09-14T00:39:05+5:30
सोलापूर :

‘आम्ही दोघी’तून घडले मनोरंजन अन् प्रबोधन लोकमत सखी मंच: आर्ट ऑफ लिव्हिंग यांच्या संयुक्त उपक्रमाला प्रतिसाद
स लापूर : संवाद, नृत्य, कला, अभिनय या मनोरंजनाबरोबर हुंडाबळी, स्त्रीभ्रूण हत्या, आजची कुटुंबव्यवस्था अशा अनेक विषयांवर ‘आम्ही दोघी’ या उपक्रमातून प्रबोधनही झाल़े लोकमत सखी मंच आणि आर्ट ऑफ लिव्हिंग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या ‘आम्ही दोघी’ या उपक्रमाला सखींचा भरभरुन प्रतिसाद लाभला़ या उपक्रमांतर्गत घेण्यात आलेल्या स्पर्धेत 30 स्पर्धकांनी जोडीने सहभाग नोंदविला़दीप प्रज्वलनाने या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला़ या आगळ्या वेगळ्या स्पर्धेचे व्हेन्यू पार्टनर हॉटेल त्रिपुरसुंदरी होत़े नणंद-भावजय, जावा-जावा, मैत्रिणी-मैत्रिणी, सासू-सून, आई-मुलगी अशा नात्यांवर आधारित जोड्या ठरविण्यात आल्या होत्या़ प्रत्येक स्पर्धकाला चार मिनिटांत आपली कला सादर करायची संधी देण्यात आली़ नृत्य, कला, गायन, संवाद, अभिनय अशी कला सादर केली आणि त्याला सखींनी टाळ्यांनी दाद दिली़ या स्पर्धेतून सखींनी स्त्रीभ्रूण हत्या, हुंडाबळी, आजची कुटुंबव्यवस्था अशा विषयांवर प्रबोधन करण्याचा प्रयत्न झाला़ त्यालाच साजेसे सूत्रसंचालन आर्ट ऑफ लिव्हिंगच्या अंजू क्षीरसागर यांनी केल़े (प्रतिनिधी) दहीहंडीचा आनंद लुटला़़़या स्पर्धेचा समारोप दहीहंडी सोहळ्याने करण्यात आला़ प्रारंभी र्शीकृष्णाचा पाळणा कार्यक्रम करण्यात आला़ त्यानंतर सखींनी दहीहंडी फोडून आनंद लुटला़ सखींच्या चेहर्यावरील आनंद ओसंडून वाहत होता़ याबरोबरच विजेत्या स्पर्धकांवर कौतुकांचा वर्षाव झाला आणि पारितोषिके देऊन त्यांचा गौरवही करण्यात आला़ आम्ही दोघीच्या विजेत्या 1)प्रथम जोडी - आरती वागावकर, हेमा देगाव 2)द्वितीय जोडी - निर्मला मेहता (सासू), दीपा मेहता (सून)-------------------------------------------फोटो = लोकमत सखी मंचचा लोगो कृपया वापरावा़ 11 डीजी 01‘आम्ही दोघी’ स्पर्धेंतर्गत अभिनय सादर करुन सखींनी काही सामाजिक विषयांवर प्रबोधन केल़े 11 डीजी 02 स्पर्धेतील विजेत्या सखींना पारितोषिके देऊन गौरविण्यात आल़े