वाढीव वीजदर कमी करण्याची इं

By Admin | Updated: March 20, 2015 22:40 IST2015-03-20T22:40:02+5:302015-03-20T22:40:02+5:30

डस्ट्रीयल असोसिएशनची मागणी

Enhance the increase in electricity tariff | वाढीव वीजदर कमी करण्याची इं

वाढीव वीजदर कमी करण्याची इं

्ट्रीयल असोसिएशनची मागणी
बारामती । दि. २० (प्रतिनिधी)
बारामती एमआयडीसी व परीसरातील उद्योग वीजेच्या वाढीव दरामुळे त्रस्त झाले आहेत. शेजारील राज्यांच्या कमी वीजदरामुळे बाजारपेठेत उद्योग स्पर्धा करु शकत नाही .त्यामुळे उद्योगांना दिलासा देण्यासाठी शासनाने वीजेचे दर कमी करावेत, अशी मागणी बारामती इंडस्ट्रीयल असोसिएशन च्या वतीने करण्यात आली आहे.
यावेळी वीजदर व समस्यांवर चर्चा करण्यासाठी आयोजित बैठकीत अधिक्षक अभियंता नागनाथ इ रवाडकर यांच्याकडे उद्योजकांनी मागणी केली.यावेळी उद्योजकांचे वीजदर कमी करण्याची मागणी शासनापर्यंत पोहोचविण्शसचे आश्वासन इ रवाडकर यांनी दिले.दरम्यान उद्योगांना कमी खर्चात वाढीव विद्युत पुरवठा करावा ,जी एफ विभागांमध्ये नवीन उपकेंद्र ऊभारावे,एमआयडीसीतील विद्युत रोहीत्रांची क्षमता वाढवावी,कार्यालयीन द़फ्तर दिरंगाई कमी करावी,सदोष वीजदेयकांमधील दुरुस्त्या त्वरीत कराव्यात आदी मागण्या यावेळी उद्योजकांनी केल्या.
यावेळी महावितरण चे उपअभियंता प्रकाश देवकाते,शाखा अभियंता गावडे, शरद सुर्यवंशी,अनंत अवचट, मनोहर गावडे, राधेश्याम शेलार,महादेव गायकवाड,आशिष पल्लोड,रावसाहेब पाटील,संतोष संत, राजकुमार दोशी आदी उपस्थित होते.
—————————————————
फोटो ओळी : वीज दरवाढ कमी करण्याबाबत बारामती इंडस्ट्रीयल असोसिएशनच्या वतीने महावितरणचे अधीक्षक, अभियंता नागनाथ इरवाडकर यांना निवेदन देण्यात आले.
२००३२०१५-बारामती-२५
————————————————

Web Title: Enhance the increase in electricity tariff

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.