इंग्रजी आपल्या भाषेतील गोडव्याप्
By Admin | Updated: August 10, 2015 00:28 IST2015-08-10T00:28:00+5:302015-08-10T00:28:00+5:30
ासून मुलांना दूर नेत आहे- विष्णू वाघ

इंग्रजी आपल्या भाषेतील गोडव्याप्
ा ून मुलांना दूर नेत आहे- विष्णू वाघफोंडयात मराठी युवा मेळावा संपन्न तळावली: आज ज्यांच प्राथमिक शिक्षण इंग्रजीमध्ये होत आहे त्या मुलांची ओठावरची भाषा मारली जात आहे. त्या लहान मुलांना परकी भाषा शिकवून त्या मुलांना आपल्या भाषेमध्यल्या गोडव्यापासून दूर ठेवण्याचे काम आजचे पालक करत आहेत असे प्रतिपादन साहित्यिक तथा सांत आंद्रे मतदार संघाचे आमदार विष्णू वाघ यांनी केले. गोवा राजभाषा समितीने फोंडयातील विश्व हिंदू परिषदेत आयोजीत केलेल्या मराठी युवा मेळाव्यावेळी ते प्रमुख पाहुणे या नात्याने बोलत होते. या वेळी व्यासपिठावर त्यांच्या समवेत उद्घाटक म्हणून फोंडयाचे आमदार लवू मामलेदार, राजभाषा समितीचे अध्यक्ष गो.रा. ढवळीकर, उपाध्यक्ष दिवाकर शिंक्रे, कार्याध्यक्ष शाणूदास सावंत, मोहन आमशेकर, मच्छिंद्र च्यारी व इतर मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाची सुरूवात संत ज्ञानेश्वरांच्या प्रतिमेला हार अर्पण करून तसेच दिपप्रज्वलन करून झाली. पुढे बोलताना विष्णू वाघ म्हणाले की गोव्यात मराठी भाषा ही महाराष्ट्रातून आलेली नाही तर ती पूर्वापार चालत आलेली आहे. संत ज्ञानेश्वरांच्या काळापासून ही भाषा गोव्यात होती. गोव्याच्या प्रत्येक घरात त्यावेळी लोक मराठी ग्रंथ, स्तोत्रे, नाटके यांचे वाचन करत असायचे. व गोव्यात मराठी भाषेचा वापर जास्त होत होता. पोतरुगीजांनी इन्क्वीझीशनच्यावेळी स्थानिक लोकांवर घातलेल्या बंदीमुळे गोव्याचा हा इतिहास पूर्णपणे बदलला. लोकांना या मातीतून तोडले गेले. धर्मप्रसारणासाठी आलेल्या जेझुईत पाद्रिनी पण मराठी भाषेत आपले लिखाण केले. थॉमस स्टिफन यांच ख्रिस्तपुराण, फ्रेंच पाद्रि पिटर यांचे पिटर पुराण हे ही मराठी भाषेतच आहे. आमच्या मातीत मराठीचे सत्व आहे. संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम ही दोन जिवन व संस्कृ ती घडवणारी मराठीने दिलेली विद्यापिठे आहेत. माणसाला निसर्गाने संवेदनशील विचारसरणी दिली आहे त्याचा वापर करावा. सरकारने त्या त्या प्रादेशीक शिक्षण देणार्या शाळानांच अनुदान दयाव व इंग्रजीला नाही असे ठाम मत त्यांनी शेवटी व्यक्त केले. फोंडयाचे आमदार लवू मामलेदार यांनी आपले मनोगत व्यक्त करताना मराठी ही गोवेकरांची जास्त जवळची भाषा असल्याचे सांगितले. मराठीमुळेच आमची संस्कृती टिकणार असून ती टिकवणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. आपल्या भाषेतून वाचलेल्या गोष्टी पटक न लक्षात येतात व आठवणीतही राहतात. त्यासाठी पालकांनीही इंग्रजीचा अट्टहास न करता आपल्या पाल्यांना संस्कृती जतनाचे माध्यम असलेल्या मराठी भाषेतून शिक्षण देण्याचे आवाहन त्यांनी केले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन नितिन कोलवेकर यांनी तर आभार मच्छिंद्र च्यारी यांनी मानले. या वेळी दिवसभर झालेल्या कार्यक्रमात मला काही सांगायच आहे या सत्रात मुलांनी आपले विचार मांडले. हुंकार मराठी मनाचा यात मुलांनी आपल्या कला पेश केल्या व नंतर प्रेक्षका बरोबर खुली चर्चा झाली. त्यानंतर कार्यक्रमाची सांगता झाली. फोटो-0908-स्रल्ल-01फोटो कॅ प्शन- मराठी युवा मेळाव्यावेळी बोलताना विष्णू वाघ,लवू मामलेदार, गो.रा. ढवळीकर, मच्छिंद्र च्यारी, दिवाकर शिंक्रे,शाणूदास सावंत व नितिन कोलवेकर.(वार्ताहर)