इंजिनिअर महिलेला खुर्चीला बांधून जिवंत जाळलं
By Admin | Updated: October 25, 2016 15:38 IST2016-10-25T15:27:16+5:302016-10-25T15:38:23+5:30
बिहारमधील मुझफ्फरपूर येथे एका महिला इंजिनिअरला खुर्चीला बांधून जिवंत जाळल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.

इंजिनिअर महिलेला खुर्चीला बांधून जिवंत जाळलं
ऑनलाइन लोकमत
पाटणा, दि. 25 - एका महिला इंजिनिअरला खुर्चीला बांधून जिवंत जाळण्यात आल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. बिहारमधील मुझफ्फरपूर जिल्ह्यात रविवारी रात्री ही धक्कादायक घटना घडली आहे. सरितादेवी असे मृत महिलेचे नाव आहे. प्राथमिक चौकशीनुसार हे हत्या प्रकरण असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
सरितादेवी या नव-यापासून वेगळ्या होऊन एका भाड्याच्या घरात स्वतंत्र रहात होत्या, याचाच फायदा घेत त्यांची हत्या करण्यात आली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
तसेच या महिलेला जाळण्यासाठी रॉकेलचा वापर करण्यात आल्याचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक विवेक कुमार यांनी सांगितले. दरम्यान, याप्रकरणाची सर्व बाजूंनी चौकशी सुरू असून लवकरच आरोपींचा छडा लावू असेदेखील कुमार यांनी म्हटले आहे.