शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
5
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
6
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
7
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
8
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
9
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
10
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
11
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
12
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
13
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
14
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
15
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
16
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
17
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
18
Thane Fire: ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
19
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
20
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
Daily Top 2Weekly Top 5

...अन् धावपट्टीपासून ५० मीटरवर असताना विमानाचे इंजिन केले बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2021 08:46 IST

नागपूर विमानतळावरून आम्ही गुरुवारी सायंकाळी ५ वाजून ६ मिनिटांनी उड्डाण केले. ९० नॉटिकल मैल दूर गेल्यानंतर नागपूर एअर ट्राफिक कंट्रोलने (एटीसी) आमच्या विमानाचे चाक उड्डाणावेळी निखळून पडल्याची माहिती दिली.

मुंबई: पश्चिम बंगाल व्हाया नागपूरहून मुंबईला येणाऱ्या बीचक्राफ्ट सी ९० या चार्टर्ड विमानाचे (हवाई रुग्णवाहिका) चाक निखळल्याने ते पोटावर उतरवावे लागले. मोठा अपघात होता होता टळला; पण चाक निखळल्याचे कळताच वैमानिकांनी काय केले, विमान धावपट्टीवर उतरविण्यापर्यंतचा थरार कसा होता, प्रवाशांनी आरडाओरड केली नाही का, याविषयी त्या विमानाचे मुख्य वैमानिक केसरी सिंह यांच्याशी साधलेला संवाद... (The plane engine was switched off when it was 50 meters from runway)

चाक निखळल्याची माहिती तुम्हाला कधी मिळाली?नागपूर विमानतळावरून आम्ही गुरुवारी सायंकाळी ५ वाजून ६ मिनिटांनी उड्डाण केले. ९० नॉटिकल मैल दूर गेल्यानंतर नागपूर एअर ट्राफिक कंट्रोलने (एटीसी) आमच्या विमानाचे चाक उड्डाणावेळी निखळून पडल्याची माहिती दिली. वॉच टॉवरवरील सीआयएसएफ जवानाने तो प्रकार प्रत्यक्षात पाहिला होता; पण ते चाक आमच्याच विमानाचे आहे का, याची खात्री करण्यासाठी त्याचे फोटो कंपनीला पाठविण्याची विनंती एटीसीला केली. त्यांनी कंपनीला फोटो पाठवलेही; पण मुंबईत पोहोचेपर्यंत पुढची माहिती माझ्यापर्यंत पोहोचली नाही.

विमान पोटावर उतरविण्याचा निर्णय कधी घेतला?ते चाक आमच्याच विमानाचे आहे का, याची खात्री करण्यासाठी मुंबई विमानतळावर लो-पास (विमान १०० मीटरपर्यंत खाली आणणे) केले. तिथल्या अधिकाऱ्यांनी आमच्या विमानाचे डावीकडील चाक गायब असल्याची माहिती दिली. त्यामुळे बेली लॅण्डिंग अर्थात विमान पोटावर उतरवण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. लँडिंग गीअर बाहेर न येणे, टायर फुटणे असे प्रकार याआधी घडलेले आहेत; पण विमानाचे चाक निखळून खाली पडण्याची घटना याआधी घडली नव्हती. त्यामुळे सर्वांसाठी हा अनुभव नवीन होता.

प्रवाशांना याबाबत माहिती दिली होती का?विमानात एक रुग्ण, त्याचे नातेवाईक, एक डॉक्टर आणि आम्ही कर्मचारी मिळून पाच जण होतो. आपत्कालीन लॅण्डिंग करावे लागणार असल्याचे डॉक्टरांच्या कानावर घातले होते. आम्ही सुरक्षित लॅण्डिंग करू, अशी खात्रीही त्यांना दिली होती. रुग्ण,त्याच्या नातेवाइकांना  माहिती न देण्याची सूचना केली होती. कारण रुग्ण ऑक्सिजनवर हाेता. त्याला हे कळल्यास दुहेरी संकट ओढवण्याची भीती होती. चाक निखळ्याची माहिती विमान कर्मचाऱ्यांशिवाय इतर कोणालाही नव्हती.

मुंबई विमानतळ प्रशासनाने कशा प्रकारे मदत केली?धावपट्टी लवचिक असल्यास सेफ लॅण्डिंग करता येईल, हा विचार करून एटीसीला फोमिंगसंदर्भात विनंती केली; पण अग्निशमन यंत्रणेने ती अमान्य केली. शेवटी डीजीसीएने मध्यस्थी केल्याने त्यांना ती मान्य करावी लागली. बाराशे फुटांपर्यंत फोमिंग करण्यासाठी १५ मिनिटांचा अवधी लागणार होता. मात्र, १५ मिनिटांनंतर फोमिंगची लवचिकता टिकत नसल्याने तात्काळ लॅण्डिंग करण्याचे आव्हान होते. मुंबई एटीसीची समयसूचकता वाखाणण्याजोगी होती. एकीकडे विमानातील इंधन जास्तीत जास्त कमी करण्यासाठी ते सूचना देत होते, तर दुसरीकडे रनवेवरील बचावकार्य वेगाने पार पाडण्याची जबाबदारीही त्यांच्याकडे होती. मुंबई विमानतळावर अशा प्रकारच्या अत्याधुनिक सुविधांची साथ मिळेल, याची खात्री असल्यानेच अर्ध्या वाटेतून नागपूरला परतण्याचा निर्णय घेतला नाही.

लॅण्डिंगवेळी विमानात किती इंधन होते? पुढचा थरार कसा रंगला?शेवटची २० मिनिटे कसोटीची होती. टायरविना असलेले विमान धावपट्टीला स्पर्श करेल तेव्हा स्पार्किंग होण्याची शक्यता होती. अशावेळी विमानात कमीत कमी इंधन असल्यास मोठी आग लागण्याचा धोका कमी होतो. ही बाब लक्षात घेऊन इंधन बाहेर फेकण्याचा वेग वाढविला; पण मनात दुसरी भीती होती की, एटीसीने आणखी वेटिंगवर ठेवल्यास इंधन संपून विमान खाली पडेल. पुढची १० मिनिटे पुरेल इतके इंधन शिल्लक असताना फोमिंगचे काम पूर्ण झाले आणि लॅण्डिंगची परवानगी मिळाली. आता आव्हान होते ते वेगमर्यादा राखून अचूक वेळी इंजिन बंद करण्याचे. अन्यथा विमान धावपट्टीला आदळून स्फोट होण्याचा धोका होता. ३० वर्षांचा अनुभव पणाला लावून धावपट्टीपासून ५० मीटरवर असताना विमानाचे इंजिन बंद केले आणि श्वास सोडला. पुढे काय झाले ते आपण जाणताच. 

टॅग्स :airplaneविमानMumbaiमुंबईAirportविमानतळpilotवैमानिक