'दुश्मन शिकार, हम शिकारी', LOCवर जवानांच्या घोषणा

By Admin | Updated: October 12, 2016 14:14 IST2016-10-12T13:44:50+5:302016-10-12T14:14:23+5:30

नियंत्रण रेषावरील जवानांचा उत्साह अधिक वाढला. या जवानांत सध्या 'दुश्मन शिकार, हम शिकारी' ही नवी घोषणा उच्चारली जात आहे.

'Enemy hunt, we hunter', the jawans announced on LOC | 'दुश्मन शिकार, हम शिकारी', LOCवर जवानांच्या घोषणा

'दुश्मन शिकार, हम शिकारी', LOCवर जवानांच्या घोषणा

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 12 - उरी दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय जवानांनी पाकमध्ये जाऊन सर्जिक स्ट्राईकनंतर भारताच्या एलओसी (नियंत्रण रेषा)वरील जवानांचा उत्साह अधिक वाढला गेला आहे. या जवानांत सध्या 'दुश्मन शिकार, हम शिकारी' ही नवी घोषणा उच्चारली जात आहे.

'भारत माता की जय' असं म्हटल्यानंतर प्रत्येक भारतीय नागरीकांना त्याचा अभिमान वाटतो, आणि आपले मनोधैर्य उंचावतं. मात्र सध्या, सैन्यामध्ये युद्धाच्यावेळी अथवा पाहरा देताना दुश्मन शिकार, हम शिकारी अशी घोषणा उच्चारत आपलं आणि आपल्या सहकार्यांच मनोधैर्य वाढवलं जात आहे. एकप्रकारे या घोषणा देत ते विरोधाकांचा खात्माचं करतं आहे.

नियंत्रण रेषेजवळ त्रि-स्तरीय फेन्सिंगवर जवान 24 तास गस्त घालतं असतात. येथे जवळच एक देवधर वृक्ष आहे. त्यावर 'दुश्मन शिकार, हम शिकारी' असं घोषवाक्य लिहलेलं आहे. हाच आमचा मंत्र असल्याचं तेथिल एका जवानानी सांगितले आहे.

Web Title: 'Enemy hunt, we hunter', the jawans announced on LOC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.