दिलदार भारत! दुश्मन चीनने मदत मागितली, भारताच्या नौदलाचे विमान लगेचच झेपावले

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2023 07:02 PM2023-05-18T19:02:16+5:302023-05-18T19:02:49+5:30

भारताजवळच्या समुद्रात हे जहाज बुडाले आहे. चीनने शोधासाठी दोन जहाजे पाठविली होती, परंतू त्यांना ते सापडत नव्हते.

Enemy China asked for help for sunken ship, Indian naval aircraft immediately swooped | दिलदार भारत! दुश्मन चीनने मदत मागितली, भारताच्या नौदलाचे विमान लगेचच झेपावले

दिलदार भारत! दुश्मन चीनने मदत मागितली, भारताच्या नौदलाचे विमान लगेचच झेपावले

googlenewsNext

हिंदी महासागरामध्ये १७ मे रोजी चीनचे जहाज बुडाले आहे. या दुर्घटनेत ३९ लोक बेपत्ता झाले आहेत. त्यांचा शोध लागत नाहीय. यामुळे चीनने भारताकडे मदत मागितली होती. एलएसीवर तणाव असला तरी भारताने माणुसकीच्या नात्याने सर्व वाद बाजुला ठेवून चीनच्या मदतीला नौदलाला पाठविले आहे. 

भारताजवळच्या समुद्रात हे जहाज बुडाले आहे. जशी चीनने मदत मागितली, तशी भारताने केप कोमोरिन नेव्हल बेसवरून P8I हे शोध घेणाऱ्या विमानाला उड्डाणाचे आदेश दिले. भारतीय नौदलाचे हे विमान भारतीय समुद्री क्षेत्रात १६६० किमी पर्यंत गेले होते. तिथेच चीनचे जहाज बुडाले होते. ही जागा मालदीवच्या थोडी पुढे आहे. 

चीनच्या या बुडालेल्या जहाजामध्ये १७ चिनी, १७ इंडोनेशियन आणि ५ फिलीपिन्सचे नागरीक होते. चीनने जहाज कुठे बुडाले याचे लोकेशनही भारताला पाठविले नव्हते. परंतू भारतीय नौदलाच्या विमानाने या जहाजाचे लोकेशन शोधून काढले आहे. तसेच जहाजातील तरंगणाऱ्या साहित्यावरही नजर ठेवली होती. महत्वाचे म्हणजे चीनने या जहाजाला शोधण्यासाठी आपल्या नौदलाच्या दोन जहाजांनाही तैनात केले होते. परंतू, त्यांना शोध लागला नव्हता. 

चीनने मदतीसाठी ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, मालदीव, इंडोनेशिया, फिलिपिन्स व अन्य देशांमधील दुतावासांना सक्रीय केले होते. तसेच भारताकडे देखील निर्वाणीची मदत मागितली होती. भारतीय विमानाने चीनच्या जहाजांना बुडालेल्या जहाजापर्यंत पोहोचविले आणि मगच पुन्हा माघारी परतले. 
 

Web Title: Enemy China asked for help for sunken ship, Indian naval aircraft immediately swooped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.