दहशतवादी हल्ला करणारे मानवतेचे शत्रू - नरेंद्र मोदी
By Admin | Updated: January 2, 2016 21:11 IST2016-01-02T21:11:56+5:302016-01-02T21:11:56+5:30
पंजाबमधील हवाई दलाच्या तळावर हल्ला करणारे दहशतवादी हे मानवतेचे शत्रू असून त्यांना भारताची प्रगती झालेली पचत नसल्याचे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

दहशतवादी हल्ला करणारे मानवतेचे शत्रू - नरेंद्र मोदी
>ऑनलाइन लोकमत
म्हैसूर, दि. २ - पंजाबमधील हवाई दलाच्या तळावर हल्ला करणारे दहशतवादी हे मानवतेचे शत्रू असून त्यांना भारताची प्रगती झालेली पचत नसल्याचे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
पंजाबमधील हवाई दलाच्या तऴावर लष्कराच्या वेषात आलेल्या काही दहशतवाद्यांनी मध्यरात्री साडेतीनच्या सुमारास हवाई दलाच्या तळावर अंदाधुंद गोळीबार करत जोरदार हल्ला चढवला. हवाई दलाच्या जवानांनीही त्यांनी चोख प्रत्युत्तर देत पाचही दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. मात्र या हल्ल्यात दोन जवान शहीद झाले तर अन्य एका जवानाचा रुग्णालयात उपचारांदरम्यान मृत्यू झाला. सुमारे १७ तासांच्या चकमकीनंतर ही मोहिम संपुष्टात आली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या कर्नाटक दौ-यावर असून म्हैसूर येथील सुत्तूर मठामध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमाच्यावेळी त्यांनी दहशतवादी कारवाई करणा-यांवर सडेतोड टिका करत जवानांचे अभिनंदन केले. दहशतवादी हे मानवतेचे शत्रू असून त्यांना भारताची प्रगती झालेली पचत नाही. असा प्रकारच्या कारवाया आमचे जवान कधीही यशस्वी होऊ देणार नाहीत. आपल्या जवानांवर मला गर्व असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.