शिक्षकांच्या कर्ज कपातीचा घोळ संपवा
By Admin | Updated: February 14, 2015 23:51 IST2015-02-14T23:51:42+5:302015-02-14T23:51:42+5:30

शिक्षकांच्या कर्ज कपातीचा घोळ संपवा
>१४ पालकमंत्री फोटो घ्यावा.......फोटो ओळी.... पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना निवेदन देताना शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष लीलाधर ठाकरे व पदाधिकारी........शिक्षक समितीची मागणी : पालकमंत्र्यांना निवेदननागपूर : जिल्हा परिषद व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वादात शिक्षकांच्या ओडी कर्ज कपातीचा घोळ सुरू आहे. तो संपविण्यात यावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या शिष्टमंडळाने पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. रिझर्व्ह बँकेच्या निर्णयानुसार जिल्हा बँकेच्या सर्व ठेवी व खात्यावरील व्यवहार बंद आहेत. या बँके त जि.प.च्या १४६ कोटींच्या ठेवी आहेत. त्या परत मिळाव्यात यावरून वाद सुरू आहे. बँकेतील ठेवी वसूल करण्याच्या हेतुने जि.प. प्रशासनाने शिक्षकांच्या वेतनातून कपात केलेली ओडी कर्जाची कपात याच खात्यावरील धनादेशाद्वारे वळती केली जात आहे. परंतु या खात्यावरील व्यवहार बंद असल्याने ही रक्कम शिक्षकांच्या कर्ज कपातीत जमा होत नाही. त्यामुळे त्यांचेवर व्याजाचा अतिरिक्त बोजा पडत आहे. ३००० हजार शिक्षक व ३७७३ जि.प.कर्मचारी ओडी धारक आहेत. या संदर्भात जि.प. व बँक अधिकाऱ्यांसोबत वेळोवेळी चर्चा करूनही अद्याप तोडगा निघालेला नसल्याचे समितीचे जिल्हाध्यक्ष लीलाधर ठाकरे व सरचिटणीस अनिल नासरे यांनी निदर्शनास आणले. या संदर्भात विभागीय आयुक्तांसोबत चर्चा करून निर्णय घ्यावा, असे निर्देश बावनकुळे यांनी जि.प.प्रशासनाला दिले. शिष्टमंडळात ठाकरे यांच्यासह सुरेश पाबळे, रामू गोतमारे, दिनकर उरकांदे, विलास काळमेघ, राजेश बीरे, रमेश कर्णेवार, सतीश देवतळे, अनिल श्रीगिरीवार, धनराज बोंडे, अनिल नागपुरे, प्रकाश सव्वालाखे, धनंजय चन्ने, अशोक डोंगरे, नारायण चाफले आदींचा सहभाग होता. (प्रतिनिधी)