चुकार संरक्षण अधिकाऱ्यांचे पार्टी कल्चर संपविणार
By Admin | Updated: November 10, 2014 04:33 IST2014-11-10T04:33:27+5:302014-11-10T04:33:27+5:30
संरक्षण अधिकारी कामात हयगय करत असून संध्याकाळचा त्यांचा वेळ बहुश: पार्टीत व्यतीत होत असतो. मला हे बदलायचे आहे,

चुकार संरक्षण अधिकाऱ्यांचे पार्टी कल्चर संपविणार
राजू नायक, नवी दिल्ली
संरक्षण अधिकारी कामात हयगय करत असून संध्याकाळचा त्यांचा वेळ बहुश: पार्टीत व्यतीत होत असतो. मला हे बदलायचे आहे,
असे मनोहर पर्रीकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले. मंत्रिपदाची शपथ घेण्यापूर्वी मारलेल्या अनौपचारिक गप्पांमध्ये त्यांनी हे मतप्रदर्शन केले.
कामाचा व्याप स्वत:च्या मागे लावून घेणारे आणि दुसऱ्यांनाही त्यासाठी प्रवृत्त करणारे टेक्नोक्रेट असणारे माजी मुख्यमंत्री आता
संरक्षण खात्यातही तीच कार्यशैली आणू पाहात आहेत. त्यांच्या बैठका सकाळी ९ वाजता सुरू होतील. कारकुनी पद्धतीचे काम पर्रीकरांना पसंत नाही. निम्न स्तरावरील कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन वेळेत काम करण्यास हरकत नाही, मात्र वरिष्ठ दर्जाच्या अधिकाऱ्यांना कामासाठी वेळेचे बंधन असू नये या मताचे ते आहेत. आपण उद्घाटने आणि फीत कापण्यात वेळ दवडणार नाही. अशी कामे हा वेळेचा अपव्यय असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.