मार्च २०१७ अखेर सर्व गावांना वीज

By Admin | Updated: November 8, 2015 00:04 IST2015-11-08T00:04:50+5:302015-11-08T00:04:50+5:30

सध्या जेथे वीज नाही अशा देशातील सर्व गांवांना केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी दीनदयाल उपाध्याय ग्रामीण ज्याती योजनेअंतर्गत मार्च २०१७पर्यंत वीजपुरवठा करण्याचा एकमुखी निर्धार

At the end of March 2017, all the villages got electricity | मार्च २०१७ अखेर सर्व गावांना वीज

मार्च २०१७ अखेर सर्व गावांना वीज

कोची : सध्या जेथे वीज नाही अशा देशातील सर्व गांवांना केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी दीनदयाल उपाध्याय ग्रामीण ज्याती योजनेअंतर्गत मार्च २०१७पर्यंत वीजपुरवठा करण्याचा एकमुखी निर्धार शनिवारी सर्व राज्यांनी व केंद्रशासित प्रदेशांनी येथे केला.
सर्व राज्यांच्या वीज, अक्षयऊर्जा व खाणमंत्र्यांच्या येथे झालेल्या दोन दिवसांच्या परिषदेत देशातील सर्वांना सन २०१९पर्यंत अहोरात्र विनाखंड वीज पुरवठा करण्यासाठी करायची कामे मिशन मोडमध्ये करण्याचेही ठरविण्यात आले.
सर्वांना वीज पुरविण्याच्या योजनेचे ज्या राज्यांचे आराखडे अद्याप अपूर्ण आहेत त्यांनी ते सल्लागार व केंद्रीय पथकांची मदत घेऊन यंदाच्या ३१ डिसेंबरपर्यंत पूर्ण करून घेण्याचेही परिषदेत ठरविण्यात आले. (वृत्तसंस्था)

परिषदेतील इतर निर्णय
एकात्मिक ऊर्जा विकास प्रकल्प मंजुरीनंतर ३० दिवसांत पूर्ण करणार.
वीज पारेषणातील तांत्रिक व व्यापारी गळती सन २०१९-२० पर्यंत १५ टक्क्यांवर आणणार.
स्मार्ट ग्रीडच्या कामांसाठी राज्य पातळीवर मिशन.
वर्ष २०१९ पर्यंत रस्त्यांवरील सर्व दिवे व अन्य वापराचे पारंपरिक बल्ब बदलून त्याऐवजी एलईडी दिवे.
हरियाणा, पंजाब, महाराष्ट्र, कर्नाटक, तमिळनाडू, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश व तेलंगण या राज्यांमध्ये वर्षभरात सध्याच्या किमान १० टक्के कृषीपंप अधिक कार्यक्षम व सौरऊर्जेवर.

Web Title: At the end of March 2017, all the villages got electricity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.