शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
5
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक इनिंग; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
11
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
12
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
13
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
14
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
15
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
16
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
17
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
18
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
19
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
20
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या

Corona Virus : "जून अखेरपर्यंत कोरोना रुग्णांची दैनंदिन संख्या 15 -20 हजारांपर्यंत येऊ शकते"

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2021 19:17 IST

Corona Virus : पुरेशा संख्येने कोरोना लसीकरण झाल्यास कोरोनाची प्रकरणे झपाट्याने खाली येतील, असे सरकारी समितीचे सदस्य डॉ. एम. विद्यासागर म्हणाले.

ठळक मुद्देआयआयटी हैदराबाद येथील डॉ. एम. विद्यासागर (IIT Hyderabad Dr M Vidyasagar) हे विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या त्रिसदस्यीय समितीचे सदस्य आहेत.

नवी दिल्ली : देशातील कोरोना रुग्णांची दैनंदिन संख्या (Daily  Covid Cases) जून अखेरीस 15 ते 20 हजारांपर्यंत येऊ शकते, असा दावा केंद्र सरकारकडून करण्यात आला आहे.  सध्या हा आकडा 3 लाखांच्या जवळपास आहेत, परंतु यासाठी कोरोना लसीकरण वेगाने करावे लागेल आणि पूर्वीप्रमाणेच सतर्कता ठेवली पाहिजे. कोरोनाची तिसरी लाट 6 ते 8 महिन्यांत येऊ शकते, असे सरकारी समितीच्या सदस्याने सांगितले आहे. तसेच, जर पुरेशा संख्येने कोरोना लसीकरण झाल्यास कोरोनाची प्रकरणे झपाट्याने खाली येतील, असे सरकारी समितीचे सदस्य डॉ. एम. विद्यासागर म्हणाले. (by the end of june coronavirus daily cases will be reduced to 15-20 thousand the claim of a member of the government panel)

आयआयटी हैदराबाद येथील डॉ. एम. विद्यासागर (IIT Hyderabad Dr M Vidyasagar) हे विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या त्रिसदस्यीय समितीचे सदस्य आहेत. त्यांनी गणित मॉडेलच्या (mathematical model) आधारावर कोरोना प्रकरणांचे मॅपिंग केले आहे. यावेळी देशात कोरोनाविरूद्ध लसीकरण अभियान वेगाने चालवण्याची गरज आहे. लोकांनी नियमांचे पालन न केल्यामुळे कोरोनाची दुसरी लाट आली. परंतु पहिल्या लाटेत कोरोनाविरोधात इम्युनिटी निर्माण झाली होती, त्यामध्येही ही प्रतिकारशक्ती कमी झाली, असे डॉ. एम विद्यासागर यांनी एनडीटिव्ही वृत्तवाहिनीला सांगितले.

(मोठी बातमी! महाराष्ट्रात परतणाऱ्या प्रवाशांसाठी RT-PCR चाचणी निगेटिव्ह असणं बंधनकारक)

याचबरोबर, अलीकडील वैज्ञानिक अभ्यासानुसार असे संकेत मिळत आहेत की, ज्या लोकांमध्ये इम्युनिटी तयार होत आहे. ती  6 ते 8 महिन्यांत गायब होते. सध्याच्या कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या तुलनेत 30 टक्के अधिक रुग्ण येत आहेत. त्यांची प्रतिकारशक्ती 6-8 महिन्यांत निघून जाईल. त्यामुळे प्रतिरोधकशक्ती राखण्यासाठी लसीकरणावर जोर देणे आवश्यक आहे, असे डॉ. एम. विद्यासागर म्हणाले.

("ममतांनी जिल्हाधिकाऱ्यांना बोलूच दिलं नाही; म्हणाल्या, त्यांच्यापेक्षा जास्त मला माहिती", भाजपाचा पलटवार)

याशिवाय, जर लसीकरण अभियान वेगाने राबविले तर नव्या कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट  होऊ शकते, असे ते म्हणाले. दरम्यान,  देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या 2,57,72,400 वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 2,76,070 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 3,874 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 2,87,122 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लस