महामार्गावर काटेरी झुडपाचे अतिक्रमण
By Admin | Updated: April 20, 2015 13:05 IST2015-04-20T01:41:10+5:302015-04-20T13:05:37+5:30
राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ वरील काटेरी वृक्ष तोडल्याने त्याच्या फाद्या या महामार्गावर येत असून मोटारसायकल वरील वाहनधारकांना हाताला व डोळ्याला फटका बसत आहे.

महामार्गावर काटेरी झुडपाचे अतिक्रमण
वराड, ता.धरणगाव : राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ वरील काटेरी वृक्ष तोडल्याने त्याच्या फाद्या या महामार्गावर येत असून मोटारसायकल वरील वाहनधारकांना हाताला व डोळ्याला फटका बसत आहे. एखाद्या वेळेस दुहेरी वाहन आल्यास खाली उतरण्यासाठी जागा नाही, साईडप्या नाहीत. त्यामुळे वाहनधारकांना काटेरी झुडपात घुसावे लागते. तर रात्री तर ा फांद्या दिसत नसल्याने वाहनधारकांना दुखापत होत आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे दुर्लक्ष करीत असून महामार्गाचे कामे सर्व ठेका पद्धतीने होत असल्याने त्वरित कामे होत नाही. सार्वजनिक विभागाअंतर्गत पाळधी येथील कार्यालय बंद राहते. तर येथे काम करणारे कर्मचारी सेवानिवृत्त झाल्याने नवीन कर्मचारी नसल्याने महामार्गाची दुर्दशा होत असून वाहनचालकांना दुखापत सहन करावी लागत आहे. सार्वजनिक विभागामार्फत काटेरी झुडपे तोडण्याची मागणी होत आहे. (वार्ताहर)