अतिक्रमण हटविलेल्या रस्त्यांवर पुन्हा भरला बाजार
By Admin | Updated: October 29, 2016 01:09 IST2016-10-29T01:09:35+5:302016-10-29T01:09:35+5:30
जळगाव: मनपाने पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण हटविलेल्या बळीरामपेठ, सुभाषचौक, शिवाजीरोड परिसरात पुन्हा पूर्वीप्रमाणे बाजार भरला आहे. दिवाळीचे निमित्त करीत आयुक्तांनीही अतिक्रमण विभागाला चार दिवस दुर्लक्ष करण्याची सूचना दिली असल्याचे समजते.

अतिक्रमण हटविलेल्या रस्त्यांवर पुन्हा भरला बाजार
ज गाव: मनपाने पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण हटविलेल्या बळीरामपेठ, सुभाषचौक, शिवाजीरोड परिसरात पुन्हा पूर्वीप्रमाणे बाजार भरला आहे. दिवाळीचे निमित्त करीत आयुक्तांनीही अतिक्रमण विभागाला चार दिवस दुर्लक्ष करण्याची सूचना दिली असल्याचे समजते. मात्र सणाच्या कालावधित बसलेला बाजार सण संपल्यानंतर उठविण्यासाठी पुन्हा मनपाला पोलीस बंदोबस्तात कारवाई करण्याची वेळ येते. त्यामुळे मनपाला नाहक आर्थिक भुर्दंड बसत आहे. त्यातच मनपा अतिक्रमण विभागाकडूनही या सातत्याने बदलत्या निर्णयांचा जोरदार लाभ उचलला जात आहे. मात्र वरिष्ठांकडून सोयीस्कर दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.