अतिक्रमित शेतरस्ते, शिवरस्ते मोकळे करा! महसूल अधिकार्‍यांच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकार्‍यांचे निर्देश

By Admin | Updated: December 20, 2014 22:27 IST2014-12-20T22:27:41+5:302014-12-20T22:27:41+5:30

अकोला: जिल्ह्यातील अतिक्रमित शेतरस्ते, पाणंद रस्ते, शिवरस्ते मोकळे करून, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत या रस्त्यांची कामे करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अरुण शिंदे यांनी शनिवारी महसूल अधिकार्‍यांच्या आढावा बैठकीत दिले.

The encroachers, open the camp! District Collector's Direction at a Review Meeting of Revenue officials | अतिक्रमित शेतरस्ते, शिवरस्ते मोकळे करा! महसूल अधिकार्‍यांच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकार्‍यांचे निर्देश

अतिक्रमित शेतरस्ते, शिवरस्ते मोकळे करा! महसूल अधिकार्‍यांच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकार्‍यांचे निर्देश

ोला: जिल्ह्यातील अतिक्रमित शेतरस्ते, पाणंद रस्ते, शिवरस्ते मोकळे करून, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत या रस्त्यांची कामे करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अरुण शिंदे यांनी शनिवारी महसूल अधिकार्‍यांच्या आढावा बैठकीत दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही सभागृहात आयोजित जिल्ह्यातील महसूल अधिकार्‍यांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. जिल्ह्यातील शेतरस्ते, शिवरस्ते व पाणंद रस्त्यांवरील अतिक्रमणे हटवून रस्ते मोकळे करणे आणि रोहयो अंतर्गत या रस्त्यांच्या खडीकरणाची कामे करण्याच्या सूचना जिल्हाधिकार्‍यांनी दिल्या. महसूल विभागांतर्गत जमीन व इतर प्रकारची प्रलंबित प्रकरणे महसूल अदालती घेऊन निकाली काढण्याचे निर्देशही जिल्हाधिकार्‍यांनी दिले. तसेच विस्तारित समाधान योजनेंतर्गत जिल्ह्यातील तालुका स्तरावर महाशिबिरे आयोजित करून, विविध योजनांतर्गत लाभार्थींना लाभ देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी शिंदे यांनी यावेळी दिले. या आढावा बैठकीला अपर जिल्हाधिकारी शिवाजी दिवेकर, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल खंडागळे, उपजिल्हाधिकारी प्रमोद देशमुख, एम.डी.शेगावकर, प्रमोदसिंह दुबे, उदय राजपूत, अकोल्याचे उपविभागीय अधिकारी प्रा.संजय खडसे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी व तहसीलदार उपस्थित होते.
बॉक्स.................................................
शाळांमध्ये विद्यार्थ्यांना दाखल्यांचे वितरण करा!
राजस्व अभियानांतर्गत जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये शिबिरे घेऊन, शाळांमधील विद्यार्थ्यांना जातीचे प्रमाणपत्र, डोमिसाईल, उत्पन्न, नॉन क्रिमिलेअर व इतर प्रकारच्या दाखल्यांचे वितरण करण्याचे निर्देश जिल्हाधिकार्‍यांनी महसूल अधिकार्‍यांना या बैठकीत दिले.

Web Title: The encroachers, open the camp! District Collector's Direction at a Review Meeting of Revenue officials

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.