बँक ांच्या विकासासाठी सरकारने उद्योगांना प्रोत्साहन द्यावे - वाणिज्य वार्ता

By Admin | Updated: February 13, 2015 23:11 IST2015-02-13T23:11:10+5:302015-02-13T23:11:10+5:30

फोटो - स्कॅन

To encourage government industries for the development of banks - Commerce talks | बँक ांच्या विकासासाठी सरकारने उद्योगांना प्रोत्साहन द्यावे - वाणिज्य वार्ता

बँक ांच्या विकासासाठी सरकारने उद्योगांना प्रोत्साहन द्यावे - वाणिज्य वार्ता

टो - स्कॅन
किशोर सांसी : विजया बँकेची यशस्वी वाटचाल
नागपूर : केंद्र सरकारने बजेटमध्ये उद्योगांना विशेष प्रोत्साहन देण्याची आवश्यकता आहे. आज अनेक निर्मिती प्रकल्पांचे ७० ते ८० टक्के काम पूर्ण झाल्यानंतरही, सरकारच्या धोरणामुळे उद्योग बंद आहेत. या उद्योगांमध्ये बँकांचा मोठ्या प्रमाणात कर्ज स्वरूपात पैसा गुंतला आहे. सरकारने बजेटमध्ये उद्योगांच्या अटी शिथिल करून, उद्योगांना प्रोत्साहन दिल्यास, बँकांचा विकास होईल, असे मत विजया बँकेचे व्यवस्थापकीय संचालक व सीईओ किशोर सांसी यांनी व्यक्त केले.
विजया बँकेच्या नागपुरातील सावरगाव शाखेच्या उद्घाटनासाठी व बँकेच्या नागपूर क्षेत्राचा आढावा घेण्यासाठी ते नागपुरात आले असता, आयोजित पत्रपरिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी बँकेचा देशभरात होत असलेला विकास व विस्ताराची माहिती दिली. १९३१ मध्ये कर्नाटकमध्ये काही शेतकऱ्यांनी एकत्र येऊन विजया बँकेची स्थापना केली. आज बँकेने देशभरात विस्तार केला असून, बँकेच्या १५८१ शाखा असून, येणाऱ्या आर्थिक वर्षात मध्य भारतात बँकेच्या १५० शाखा सुरू होणार आहे. जनधन योजनेंतर्गत बँकेने ११.१८ कोटी बचत खाते उघडले आहे. यातून बँकेकडे ३८.४० कोटी रुपये जमा झाले आहे. बँक कर्मचाऱ्यांनी ५ दिवसांच्या बंदचा इशारा दिला आहे. चर्चेतून बँक कर्मचाऱ्यांचा प्रश्न निवळेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केला. बँकि ंग क्षेत्रात खाजगी बँकेच्या प्रवेशामुळे स्पर्धा वाढली आहे. यातून सार्वजनिक बँकांनीही स्वत:चा विकास आणि विस्तार केला असल्याचे ते म्हणाले. पत्रपरिषदेला विभागीय सह व्यवस्थापक राजेंद्रकुमार उपस्थित होते.

Web Title: To encourage government industries for the development of banks - Commerce talks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.