शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

यूपीपाठोपाठ दिल्लीत एन्काउंटरमध्ये वाढ, जूनच्या पहिल्या पाच दिवसांत पाच एन्काउंटर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 06:25 IST

Encounters In Delhi: दिल्लीमध्ये पोलिसांकडून एन्काउंटरमध्ये नाट्यमय वाढ दिसून येत आहे. गुन्हेगारांना लक्ष्य करणाऱ्या अनेक कारवाया वेगाने होत आहेत. यामुळे दिल्ली पोलिस उत्तर प्रदेशच्या आक्रमक मॉडेलचा अवलंब करीत आहेत का, असे प्रश्न उपस्थित होत आहेत.

- हरीश गुप्ता नवी दिल्लीदिल्लीमध्ये पोलिसांकडून एन्काउंटरमध्ये नाट्यमय वाढ दिसून येत आहे. गुन्हेगारांना लक्ष्य करणाऱ्या अनेक कारवाया वेगाने होत आहेत. यामुळे दिल्ली पोलिस उत्तर प्रदेशच्या आक्रमक मॉडेलचा अवलंब करीत आहेत का, असे प्रश्न उपस्थित होत आहेत.

दिल्ली पोलिसांनी यावर्षी एप्रिलमध्ये सर्वोच्च न्यायालयात स्पष्ट केले होते की, राजधानीत ९५ संघटित गुन्हेगारी टोळ्या सक्रिय आहेत. जून २०२५ च्या पहिल्या पाच दिवसांत दिल्ली पोलिसांनी पाच हाय-प्रोफाइल एन्काउंटर केले आहेत. २ जूनला जैतपूरमध्ये हेड कॉन्स्टेबलवर हल्ला करणाऱ्या आसिफला चकमकीनंतर अटक करण्यात आली. 

कालिंदी कुंजमध्ये झालेल्या एका अन्य एन्काउंटरमध्ये मुलीचे अपहरण करून तिची हत्या केल्याचा आरोप असलेल्या राजपालला चकमकीनंतर अटक करण्यात आली. त्याच दिवशी न्यू उस्मानपूरमध्ये गोळीबारानंतर दरोड्याचा कट रचणाऱ्या तीन आरोपींना अटक करण्यात आली.

दुसऱ्या एका एन्काउंटरमध्ये कुख्यात भाऊ टोळीशी संबंधित एका शूटरला स्पेशल सेलने अटक केली. या गोळीबारात त्याच्या पायाला गोळी लागली. ५ जूनला शेख सरायजवळ दिल्ली पोलिसांनी दोन गुन्हेगारांना गोळीबारानंतर पकडले. या चकमकींची वेळ महत्त्वाची आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काही महिन्यांपूर्वी गुन्हेगारी टोळ्यांशी दोन हात करताना कठोर राहण्याचे निर्देश दिले होते.

८ वर्षांत १२,९६४ चकमकी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील उत्तर प्रदेश पोलिसांच्या झीरो टॉलरन्स धोरणाचा संदर्भ म्हणून या चकमकींकडे बघितले जात आहे. ज्यामध्ये २०१७-२०२४ दरम्यान १२,९६४ चकमकी झाल्या.यात २०७ जणांचा मृत्यू झाला. चकमकींचा असा एकत्रित डेटा दिल्ली पोलिसांच्या वेबसाइटवर कुठेही उपलब्ध नाही. दिल्ली पोलिसांनी चकमकींदरम्यान मारले नाही, तर पायात गोळ्या घालून गुन्हेगारांना जखमी केले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीdelhiदिल्ली