शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

झारखंडमधील चकमकीत 5 नक्षलवाद्यांचा खात्मा, एक जवान शहीद

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2019 14:20 IST

झारखंडमधील डुमका येथे रविवारी (2 जून) सीमा सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली आहे. या चकमकीत चार ते पाच नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात  सुरक्षा दलाला यश आले आहे.

ठळक मुद्देझारखंडमधील डुमका येथे रविवारी सीमा सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली आहे. चकमकीत चार ते पाच नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आले आहे.एक जवान शहीद झाला असून चार जवान जखमी झाले आहेत.

दुमका - झारखंडमधील डुमका येथे रविवारी (2 जून) सीमा सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली आहे. या चकमकीत चार ते पाच नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात  सुरक्षा दलाला यश आले आहे. तर यामध्ये एक जवान शहीद झाला असून चार जवान जखमी झाले आहेत. जखमी जवानांना उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, झारखंडमधील डुमका येथे चकमक झाली. रानेश्वर ठाण्याच्या हद्दीत कठलियाजवळ ही चकमक झाली. चकमकीत चार ते पाच नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. यावेळी चार जवान जखमी झाले तर एक जवान शहीद झाला. नक्षलवाद्यांशी लढताना गंभीर जखमी झालेल्या एका जवानाला हेलिकॉप्टरने रांची येथे उपचारासाठी हलवण्यात आले आहे. तर इतर तीन जवानांवर दुमका येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पोलीस अधीक्षक वाय. एस. रमेश यांनी दिलेल्या माहितीनुसार, शिकारीपाडा आणि रानेश्वर ठाण्याच्या हद्दीतील जंगलात 15 ते 20 नक्षलवादी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, पोलीस आणि सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी शोधमोहीम हाती घेतली. त्याचवेळी नक्षलवाद्यांनी गोळीबार सुरू केला. सुरक्षा दलाच्या जवानांनीही गोळीबार केला. या चकमकीत चार ते पाच नक्षलवाद्यांचा खात्मा झाल्याची माहिती आहे. सध्या परिसरात शोधमोहीम सुरू आहे.

आंध्र प्रदेशातील कोरापूरच्या पडुवा जंगलात काही दिवसांपूर्वी सुरक्षा रक्षक आणि नक्षलवादी यांच्यात झालेल्या चकमकीत पाच नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. खात्मा करण्यात आलेल्या नक्षलवाद्यांमध्ये तीन महिलांचा समावेश होता. चकमकीदरम्यान सुरक्षा रक्षकांनी नक्षवाद्यांकडून शस्त्रास्त्रे जप्त केली होती. आंध्र प्रदेशच्या सीमेवर कोरापूरजवळील जंगलात काही नक्षलवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा रक्षकांना मिळाली होती. त्यानुसार सुरक्षा रक्षकांनी जंगल परिसरात घेराव घातला. यावेळी नक्षलवाद्यांनी सुरक्षा रक्षकांवर गोळीबार करण्यास सुरुवात केली. त्याला सुरक्षा रक्षकांनी प्रत्युत्तर देत पाच नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले. तसेच, नक्षलवाद्यांनी आपल्या कमांडरना वाचविण्यासाठी सगल सहा आयईडी स्फोट केले होते.  

छत्तीसगडमधील दंतेवाडा येथे सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली होती. या चकमकीत दोन नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आले होते. दंतेवाडात जिल्हा राखीव सैनिक (डीआरजी) व विशेष कृती दलाच्या जवानांनी गोंदरस जंगलात ही संयुक्त कारवाई केली. अरनपूरजवळ असलेल्या गोंदरसच्या जंगलात ही कारवाई करण्यात आली असून या कारवाईत पहिल्यांदाच महिला कमांडो सहभागी झाल्या होत्या. घटनास्थळावरून एक रायफल, 12 बंदुकांसह मोठ्या प्रमाणात दारू गोळा आणि शस्त्रसाठा जप्त करण्यात आला होता. 

याशिवाय, छत्तीसगडमधील बिजापूर येथे सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये रविवारी (21 एप्रिल) चकमक झाली होती. छत्तीसगडमध्ये नक्षलविरोधी विशेष पथक (ग्रेहाऊंड फोर्स) आणि छत्तीसगड पोलिसांच्या संयुक्त कारवाईत दोन नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. बिजापूर येथे सकाळी सर्च ऑपरेशन सुरू असताना जंगलात लपून बसलेल्या काही नक्षलवाद्यांनी पोलिसांच्या दिशेने गोळीबार सुरू केला. त्याला प्रत्युत्तर म्हणून या पोलिसांनीही गोळीबार केला होता. चकमकीदरम्यान दोन जणांचा खात्मा करण्यात पोलिसांना यश आले होते. 

 

टॅग्स :Jharkhandझारखंडnaxaliteनक्षलवादी