कचरा उचलण्याची यंत्रणा कार्यक्षम करा प्रवीण डोंगरे: २४ तास सेवा द्या
By Admin | Updated: July 31, 2015 23:03 IST2015-07-31T23:03:22+5:302015-07-31T23:03:22+5:30
सोलापूर : शहर सुंदर व स्वच्छ होण्यासाठी घनकचरा व्यवस्थापन चांगले असणे महत्त्वाचे आहे. सोलापूरची स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरू असताना हा प्रश्न सुटलेला नाही. कचर्यावर वीज निर्मितीचा प्रकल्प यशस्वी झाला आहे. त्यामुळे मंडईतील कचरा हलविण्यासाठी २४ तास सेवा द्यावी, अशी सूचना उपमहापौर प्रवीण डोंगरे यांनी अधिकार्यांना दिली.

कचरा उचलण्याची यंत्रणा कार्यक्षम करा प्रवीण डोंगरे: २४ तास सेवा द्या
स लापूर : शहर सुंदर व स्वच्छ होण्यासाठी घनकचरा व्यवस्थापन चांगले असणे महत्त्वाचे आहे. सोलापूरची स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरू असताना हा प्रश्न सुटलेला नाही. कचर्यावर वीज निर्मितीचा प्रकल्प यशस्वी झाला आहे. त्यामुळे मंडईतील कचरा हलविण्यासाठी २४ तास सेवा द्यावी, अशी सूचना उपमहापौर प्रवीण डोंगरे यांनी अधिकार्यांना दिली. उपमहापौर डोंगरे यांनी कचरा संकलन व विल्हेवाट या विषयावर आरोग्य विभागाची बैठक घेतली. बैठकीला सहायक आयुक्त प्रदीप साठे, मुख्य आरोग्य निरीक्षक आराध्ये व आरोग्य निरीक्षक उपस्थित होते. घरोघरी जाऊन कचरा गोळा होणे महत्त्वाचे आहे. पुरेशा घंटागाड्या असताना समाधानकारकपणे कचरा उचलला जात नाही. घंटागाड्यांचे मार्ग व थांबे यांची माहिती १० ऑगस्टपर्यंत उपलब्ध करावी. कचरा प्रकारात हॉटेल, ज्यूस सेंटर, मंगल कार्यालय, भाजी मंडई, विडीपत्ता असा कचरा वेगळा गोळा करणे महत्त्वाचे आहे. हा कचरा वीज निर्मिती प्रकल्पाला उपयोगी आहे. असा कचरा उचलण्यासाठी २४ तास सेवा द्यावी. घराघरातील कचरा गोळा करताना ओला व सुका कचरा साठविण्याबाबत लोकांना विनंती करावी, अशी सूचना डोंगरे यांनी केली.