रोजगार हमीच्या बातमीचा जोड़़़
By Admin | Updated: December 2, 2014 23:30 IST2014-12-02T23:30:27+5:302014-12-02T23:30:27+5:30
रोजगार हमी योजना अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावी,यासाठी प्रत्येक गावात ग्रामरोजगार सेवकाची नियुक्ती करण्यात आली आहे़ हे सेवक गावातील मजुरांचे आधारकार्ड जमा करतील़ आधार क्रमांक घेऊन तो तहसील कार्यालयाला कळविला जाणार आहे़ गेल्या काही दिवसांपासून ६१ हजार ४०६ मजुरांचे आधारकार्ड प्रशासनास प्राप्त झाले आहेत़ आधारकार्डच्या विशेष मोहिमेतंर्गत १४ हजार ६६५ मजुरांचे आधारकार्ड उपलब्ध झाले असून, उर्वरित मजुरांचे आधारकार्ड येत्या ३१ डिसेंबरपर्यंत घेण्यात येणार असून, सर्व मजुरांचे आधार क्रमांक घेऊन बँकांना पाठविले जातील़ बँकांकडून तिन्ही क्रमांकांची तपासणी करून मजुरीचे वाटप केले जाणार असल्याचे प्रशासकीय सूत्रांकडून सांगण्यात आले़ रोजगार हमी योजनेची व्याप्ती वाढविली जात असून, यामध्ये प्रत्येक गावात विकास कामे हाती घेण्यात येणार असून्

रोजगार हमीच्या बातमीचा जोड़़़
म र्तिजापूर : नजीकच्या नवसाळ फाट्यावर १ डिसेंबरला सकाळी ट्रकने ओम्नी व्हॅनला धडक दिल्याने झालेल्या अपघातप्रकरणी मूर्तिजापूर पोलिसांनी घटनास्थळावरून पळून गेलेल्या ट्रकचालकाला सोमवारी रात्रीच अटक केली.अक्षयलाल राम आसरे (२७, रा. अंकलेश्वर, गुजरात) असे ट्रकचालकाचे नाव आहे. तो मूर्तिजापूरनजीक असलेल्या एका ढाब्यावर लपून बसला असल्याची टीप सोमवारी रात्री पोलिसांना मिळाली होती. मूर्तिजापूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी नंदकुमार काळे यांनी मानाचे ठाणेदार सुनील हुड यांना ही माहिती दिली. त्यानंतर ठाणेदार हुड यांनी हेडकॉन्स्टेबल पद्मने , उमक, शे. इरफान यांच्यासमवेत संबंधित ढाब्यावर जाऊन ट्रकचालकास अटक केली. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे. (तालुका प्रतिनिधी)०००००००००००००