प्रशासनात कर्मचाऱ्यांची भूमिका महत्त्वाची
By Admin | Updated: August 2, 2015 22:55 IST2015-08-02T22:55:08+5:302015-08-02T22:55:08+5:30
प्रशासनात कर्मचाऱ्यांची भूमिका महत्त्वाची

प्रशासनात कर्मचाऱ्यांची भूमिका महत्त्वाची
प रशासनात कर्मचाऱ्यांची भूमिका महत्त्वाचीविद्यासागर चव्हाण : कामठी येथे महसूल दिनकामठी : प्रशासकीय कामकाजात अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांचीही भूमिका महत्त्वाची असते. सर्वसामान्यांपर्यत विविध शासकीय योजनांचा लाभ पोहोचविण्यासाठी त्यांना विविध प्रमाणपत्र, दाखले देण्यासाठी प्रशासन आणि कर्मचाऱ्यांत समन्वय असणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन तहसीलदार विद्यासागर चव्हाण यांनी व्यक्त केले. स्थानिक तहसील कार्यालय सभागृहात महसूल दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी तालुका वीज वितरण समस्या निवारण समितीचे उज्वल रायबोले, नायब तहसीलदार दीपक मावळे, अरविंद खळतकर आदी उपस्थित होते.महसूल वर्षात आपापल्या विभागात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा प्रमाणपत्र व भेटवस्तू प्रदान करुन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला राजेश काठोके, भूपेेंद्र कापटे, प्रज्वल पाथरे, उषा धुर्वे, सीमा जाधव, कमलेश चव्हाण, ताराचंद जामगडे, शेख निसार, एस. एन. तालेवार, व्ही. बी. सडमाके, एच. एस. गभणे, एस. बी. काळबांडे, आर. एस. हिवरकर, एस. आर. मेश्राम, मिथिलेश कोल्हे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)