शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जाहीरनाम्यांमध्ये पर्यावरणावर भर! राष्ट्रीय पक्षांच्या दृष्टिकोनात झाला चांगला बदल, तज्ज्ञांचे मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2024 09:49 IST

वन आणि वन्यजीव रक्षण यासह काही बाबींमध्ये केंद्र सरकारने घेतलेले निर्णय व राजकीय पक्षांनी निवडणुकीत दिलेली आश्वासने यात विरोधाभास आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: दोन दशकांपूर्वी काँग्रेस, भाजपसारख्या राष्ट्रीय पक्षांच्या जाहीरनाम्यात पर्यावरण या विषयाबद्दल काही ओळीच असायच्या; पण आता हवामान बदल, पर्यावरणाचे झालेले नुकसान याबद्दल आता काही पाने असतात. हा बदल सुखावह आहे, असे मत पर्यावरण तज्ज्ञांनी व्यक्त केले. पर्यावरणाच्या प्रश्नांकडे राजकीय पक्षांनी अधिक लक्ष देण्यास सुरुवात केली, हे स्वागतार्ह आहे. या बद्दल विधी सेंटर फॉर लिगल पॉलिसी या संस्थेतील संशोधक देवादित्य सिन्हा यांनी सांगितले की, पर्यावरण धोरणाच्या काही बाबींमध्ये मोठ्या सुधारणा

होणे अपेक्षित आहे. मात्र, त्याबद्दल भाजपने आपल्या जाहीरनाम्यात काहीही उल्लेख केलेला नाही. वन आणि वन्यजीव रक्षण यासह काही बाबींमध्ये केंद्र सरकारने घेतलेले निर्णय व राजकीय पक्षांनी निवडणुकीत दिलेली आश्वासने यात विरोधाभास आहे. त्यामुळे पर्यावरण व वने यांच्या रक्षणाबाबतची काही आश्वासने ही प्रतीकात्मक ठरली असल्याचे पर्यावरण तज्ज्ञांना वाटते. भाजपने आपला ६९ पानांचा जाहीरनामा गेल्या शनिवारी प्रसिद्ध केला. त्यात तीन पाने पर्यावरण, हवामान बदल या विषयाला वाहिलेली आहेत. शाश्वत भारतासाठी मोदी यांची गॅरंटी या विभागात ही पाने समाविष्ट करण्यात आली आहेत.

१९९९च्या लोकसभा निवडणुकांवेळी भाजपने प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यात पर्यावरण रक्षणाबद्दल फक्त एक परिच्छेद होता. हवामान बदल हा शब्द भाजपने १९९९ व २००४ साली प्रसिद्ध केलेल्या निवडणूक जाहीरनाम्यात वापरलाच नव्हता.

हवामान बदलाच्या मुद्द्याला महत्त्वयंदा लोकसभा निवडणुकांसाठी काँग्रेसने प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यामध्ये पर्यावरण, हवामान, आपत्कालीन व्यवस्थापन, पाणी याच्याशी संबंधित मुद्द्यांसाठी दोन पाने राखून ठेवली आहेत. या दोन्ही पक्षांनी गेल्या लोकसभा निवडणुकांच्या वेळी प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यांशी तुलना केली असता यंदा त्यांनी हवामान बदल, पर्यावरणीय शाश्वतता या मुद्द्यांना अधिक महत्त्व दिल्याचे दिसून येते.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४environmentपर्यावरण