शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
2
आजचे राशीभविष्य, १६ डिसेंबर २०२५: सरकारी कामात यश, अचानक धनलाभ; सुखाचा दिवस
3
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
4
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
5
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
6
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
7
संपादकीय : यत्र, तत्र, पाकिस्तान सर्वत्र! ऑस्ट्रेलियातील हल्ल्याचे पाकिस्तानी कनेक्शन
8
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
9
सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला-उत्तर कमी, गुंता अधिक! न्यायालयीन सल्ल्यामुळे राजकीय अनिश्चितता वाढली
10
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
11
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
12
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
13
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
14
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
15
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
16
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
17
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
18
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
19
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
20
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

आता ५ दिवसात शरीरातील कोरोना विषाणू नष्ट करणारं औषध आलं!, कंपनीनं DCGI कडे मागितली परवानगी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2021 14:41 IST

हेटरो (Hetero) कंपनीनं कोरोना विषाणूवरील प्रभावी औषध ठरणाऱ्या मोलनुपिराविर (Molnupiravir) औषधाच्या आपत्कालीन वापराची परवानगी ड्रग्ज कंट्रोलर ऑफ इंडियाकडे (DCGI) मागितली आहे.

हेटरो (Hetero) कंपनीनं कोरोना विषाणूवरील प्रभावी औषध ठरणाऱ्या मोलनुपिराविर (Molnupiravir) औषधाच्या आपत्कालीन वापराची परवानगी ड्रग्ज कंट्रोलर ऑफ इंडियाकडे (DCGI) मागितली आहे. मोलनुपिराविर टॅबलेट कोरोनाची सौम्य लक्षणं असणाऱ्या रुग्णांसाठी वरदान ठरणार आहे. हेटरो कंपनीनं केलेल्या वैद्यकीय चाचणीत रुग्णाच्या शरीरातून कोरोना विषाणूचा पाच दिवसांत नायनाट करण्याची क्षमता या औषधात असल्याचा दावा करण्यात आला आहे. (Emergency use Permission sought from DCGI for corona drug Molnupiravir company claims virus can be eliminated from the body in 5 days)

जगात कोरोना मृत्यूंचा आकडा ४० लाखांवर, १८ कोटींहून अधिक रुग्ण; बरे झाले १७ कोटी

तिसऱ्या टप्प्यातील अंतरिम चाचणीत १२१८ रुग्णांवर या औषधाची चाचणी करण्याची परवानगी मागण्यात आली आहे. merck आणि Ridgeback Biotherapeutics LP कंपनीनं या औषधाची निर्मिती केली आहे. जे रुग्ण रुग्णालयात दाखल नाहीत आणि राहत्या घरीच उपचार घेत आहेत, अशा रुग्णांसाठी हे औषध अतिशय उपयुक्त ठरणार आहे. औषधाची अंतिम चाचणी ७१४ रुग्णांवर करण्यात आली होती. 

डेल्टा प्लस व्हेरियंट ही कोरोनाची तिसरी लाट ठरू नये! इंटरनल मेडिसिन एक्स्पर्ट डॉ. तुषार राणे यांचे मत

५ दिवसात शरीरातून कोरोना विषाणूचा नायनाटऔषध निर्माती कंपनी मर्कनं कोविड-१९ विषाणूवर प्रभावी ठरणाऱ्या रेमडेसिवीर इंजेक्शनशी मिळतंजुळतं औषध असणाऱ्या मोलनुपिराविरच्या उत्पादनासाठी भारतात पाच जेनेरिक औषध निर्मात्या कंपन्यांसोबत करार करण्याची घोषणा करण्यात आली होती. या औषधावर करण्यात आलेल्या अभ्यासादरम्यान चांगले परिणमा समोर आले आहेत. यात कोरोना संक्रमित झालेल्या रुग्णानं या औषधाचं सेवन केल्यांतर शरीरातील विषाणूंच्या प्रमाणात सातत्यानं घट होत असल्याचं दिसून आलं होतं. 

देशात कोरोनाची स्थिती काय?देशातील कोरोनाची सद्यस्थिती पाहता केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं शुक्रवारी सकाळी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार गेल्या २४ तासांत देशात ४३ हजार ३९३ नवे रुग्ण आढळले आहेत. तर ९११ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या देशात ४ लाख ५८ हजार ७२७ सक्रीय रुग्ण आहेत. 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या