पाण्यासाठी आपातकालीन आराखडा
By Admin | Updated: August 20, 2015 22:09 IST2015-08-20T22:09:53+5:302015-08-20T22:09:53+5:30
इतर वापरावर कडक निर्बंध घालणार

पाण्यासाठी आपातकालीन आराखडा
इ र वापरावर कडक निर्बंध घालणार महापालिकेकडून या आपातकालीन आराखडयाची अंमलबजावणी सुरू करण्यात आल्यानंतर पिण्याचे पाणी इतर कामांसाठी वापरण्यावरही कडक निर्बंध घालण्यात येणार आहेत. त्यात प्रामुख्याने शहरातील बांधकामांना वापरले जाणरे पाणी, अनधिकृत नळजोडांवर कारवाई, गाडया धुणे ( वॉशींगसेंट), हॉटेलमध्ये भांडी धुण्यासाठी बंदी, स्विमिंगपूल मध्ये पिण्याचे पाणी वापरू नये, टँकरद्वारे हददीबाहेर पाणी पुरवठयावर जीपीएस यंत्रणेद्वारे नियंत्रण, अशी बंधने घालण्यात येणार आहेत. त्यासाठी प्रभाग समितीच्या माध्यमातून प्रत्येक प्रभागात या नियमांची अंमलबजावणी करण़्यासाठी स्वतंत्र बैठकाही घेतल्या जाणार आहेत.===================अशी आहे.. इतर जलस्त्रोतांची स्थिती या वर्षी प्रमाणेच 2010 मध्येही शहराला पाणी पुरवठा करणा-या खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने दडी मारल्याने पाणीटंचाईचे संकट शहरावर ओढावले होते. यावेळी महापालिकेकडून अशाच प्रकारे शहरातील इतर जलस्त्रोतांचे सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यात 5 हजार खासगी तर 649 महापालिकेच्या मालकिचे बोअरवेल असल्याचे आढळून आले होते. तर खासगी मालकिच्या 398 तर पालिकेच्या 50 अशा जवळपास 400 विहीर असल्याचे समोर आले होते. त्यामुळे पाणी टंचाईच्या संकटात हे विविध प्रकारचे जलस्त्रोतचे महापालिकेचा आधार ठरणार आहेत. या शिवाय अनेक ठिकाणी पेशवेकालीन पाण्याचे उच्छवास आहेत. त्यांचाही वापर प्रशासनाकडून करण्यात येणार आहे.----------------शहरासाठीच्या पाण्याची स्थिती 2007 आणि 2010 पेक्षाही गंभीर आहे. त्यामुळे पुढील वर्षाचे नियोजन अत्तापासूनच करणे योग्य ठरणार आहे. कालवा समितीची बैठक येत्या 22 ऑगस्ट रोजी होणार असून त्या बैठकीत शहराला किती पाणी देणार हे निश्चित झाल्यानंतर पालिकेकडून पाणी बचतीच्या तसेच काटकसरीच्या उपाय योजना तातडीने हाती घेण्यात येतील.- कुणाल कुमार ( महापालिका आयुक्त )======================