पाण्यासाठी आपातकालीन आराखडा महापालिका : खासगी विहरी, बोअरवेल ताब्यात घेणार
By Admin | Updated: August 20, 2015 22:09 IST2015-08-20T22:09:53+5:302015-08-20T22:09:53+5:30
पुणे : पावसाळा सुरू होऊन तब्बल अडीच महिन्यांचा कालावधी लोटला असला तरी, शहराला पाणी पुरवठा करणा-या धरणांमध्ये अवघा 50 टक्केच पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यातच, याच पाण्यावर जिल्ह्यातील काही गावांचा पाणी पुरवठा आणि सिंचनासाठीचे पाणी अवलंबून असल्याने येत्या काही महिन्यात पाण्यावरून शहर आणि ग्रामिण असा वाद पेटणार आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांना वापरण्यासाठी लागणा-या पाण्याचा पुरवठा शहरातील जलस्त्रोतांच्या माध्यमातून करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. त्यासाठी पाणी पुरवठयाचा आपातकालीन आराखडा करण्याचे काम महापालिका प्रशासनाने हाती घेतले असून वॉर्ड स्तरावर पाणी पुरवठा करण्यासाठी सूक्ष्म नियोजन करण्यात येणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी गुरूवारी लोकमतशी बोलताना दिली. या आपातकालीन स्थितीशी

पाण्यासाठी आपातकालीन आराखडा महापालिका : खासगी विहरी, बोअरवेल ताब्यात घेणार
प णे : पावसाळा सुरू होऊन तब्बल अडीच महिन्यांचा कालावधी लोटला असला तरी, शहराला पाणी पुरवठा करणा-या धरणांमध्ये अवघा 50 टक्केच पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यातच, याच पाण्यावर जिल्ह्यातील काही गावांचा पाणी पुरवठा आणि सिंचनासाठीचे पाणी अवलंबून असल्याने येत्या काही महिन्यात पाण्यावरून शहर आणि ग्रामिण असा वाद पेटणार आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांना वापरण्यासाठी लागणा-या पाण्याचा पुरवठा शहरातील जलस्त्रोतांच्या माध्यमातून करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. त्यासाठी पाणी पुरवठयाचा आपातकालीन आराखडा करण्याचे काम महापालिका प्रशासनाने हाती घेतले असून वॉर्ड स्तरावर पाणी पुरवठा करण्यासाठी सूक्ष्म नियोजन करण्यात येणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी गुरूवारी लोकमतशी बोलताना दिली. या आपातकालीन स्थितीशी सामना करण्यासाठी शहरातील खासगी विहरी, बोअवेल्स, तसेच इतर पाण्याचे जलस्त्रोत महापालिकेकडून ताब्यात घेण्यात येणार असल्याचेही नियोजन असल्याचे कुमार यांनी स्पष्ट केले. तसेच धरणांमधील पाणी पिण्या व्यतिरिक्त इतर कामांसाठी वापरण्या वरही कडक निर्बंध घालण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. तसेच कालवा समितीच्या बैठकीपूर्वी हा आराखडा पूर्ण करण्यासाठी महापालिका प्रशासनाचे प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 2007 मध्ये शहरात अशाच प्रकारे पाणी टंचाईचे संकट ओढावल्यानंत़र करण्यात आलेल्या उपाय योजनांच्या धर्तीवरच हा आराखडा तयार करण्यात येत असल्याचेही ते म्हणाले. ==========प्रत्येक प्रभागासाठी सूक्ष्म नियोजन या आराखडया अंतर्गत प्रत्येक प्रभागाच्या वापराच्या पाण्यासाठी सूक्ष्म नियोजन आराखडा तयार करण्यात येणार आहे. त्यात प्रभागामध्ये असलेल्या बोअरवेल्स, खासगी विहरी, महापालिकेच्या बोअरवेल्स तसेच इतर जलस्त्रोतांची माहिती संकलीत करण्यात येत आहे. त्यानंतर या स्त्रोतांमधील किती पाणी पिण्या योग्य तर किती पिण्यासाठी अयोग्य आहे. याची तातडीने तपासणी केली जाईल. त्यानुसार, हे पाणी प्रभागांमध्ये स्वतंत्र यंत्रणा उभारून नागरिकांना वापरण्यासाठी पुरविले जाईल. तसेच ज्या ठिकाणचे पाणी पिण्यायोग्य आहे. ते पाणी टँकर द्वारे शहराच्या इतर भागांमध्ये पोहचविण्याची व्यवस्था केली जाणार आहे. त्यानुसार, प्रभागांमध्ये असलेल्या जलस्त्रोतांवर सूक्ष्म नियोजन आराखडा असणार आहे.=========== या बातमीच्या आणखी महत्वाच्या चौकटी आहेत...