शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईहून केरळला जाणाऱ्या Air India च्या विमानात बॉम्बची धमकी, तिरुअनंतपुरम एअरपोर्टवर इमरजन्सी घोषित

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2024 09:35 IST

तिरुअनंतपुरम एअरपोर्टवर इमरजन्सी घोषित करण्यात आली आहे. प्रवाशांना विमानातून बाहेर काढण्यात आल्याचेही समजते...

मुंबईवरून केरळची राजधानी असलेल्या तिरुअनंतपुरमला जात असलेल्या एका विमानात गुरुवारी बॉम्ब असल्याची धमकी मिळाली. या धमकीनंतर तिरुअनंतपुरम एअरपोर्टवर एकच खळबळ उडाली. यानंतर, तिरुअनंतपुरम एअरपोर्टवर इमरजन्सी घोषित करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार प्रवाशांना विमानातून बाहेर काढले जात आहे. मात्र, बॉमच्या धमकीने संपूर्ण एअरपोर्टवर प्रचंड गोंधळ उडाला आहे.

यासंदर्भात माहिती देताना एअरपोर्ट प्रशासनाने म्हटले आहे, "एअर इंडिया फ्लाइट 657 तिरुअनंतपुरम एअरपोर्टवर लँड झाले आहे. बॉम्बच्या धमकीनंतर इमरजन्सी घोषित करण्यात आली आहे. संबंधित विमान सध्या आयसोलेशन बेमध्ये ठेवण्यात आले आहे. प्रवाशांना लवकरच बाहेर काडले जाईल. हे विमान आयसोलेशन बेमध्ये ठेवण्यात आल्याने इतर विमानांना कसल्याही प्रकारचा धोका नाही. ही बॉमची धमकी अफवा तर नाही, यासंदर्भात तपास सुरू आहे. कारण अधिकांश प्रकरणात असेच घडते. 

...अन् एअरपोर्टवर लागू झाली इमरजन्सी -स्थानीय माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, "विमानाची कसून तपासणी केली जात आहे. मुंबई-तिरुवनंतपुरम फ्लाइटच्या पायलटने विमानतळाच्या हवाई वाहतूक नियंत्रणाला बॉम्ब असल्याची माहिती दिली होती. यानंतरच विमानतळावर इमर्जन्सी जाहीर करण्यात आली. एअर इंडियाचे विमान सकाळी 8.10 वाजता तिरुअनंतपुरम विमानतळावर उतरणार होते. मात्र, बॉम्बच्या धमकीमुळे ते लवकर आणण्यात आले. मुंबई विमानतळावरून पहाटे 5.45 वाजता या विमानाने उड्डाण केले होते.

विमानात एकूण 135 प्रवासी होते -टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, या विमानात एकूण 135 प्रवासी होते. महत्वाचे म्हणजे, पायलटला ही माहिती कुठून मिळाली यासंदर्भात अद्याप काहीही समजू शकलेले नाही. पोलीस चौकशीनंतरच संपूर्ण चित्र स्पष्ट होईल. 

टॅग्स :Air Indiaएअर इंडियाMumbaiमुंबईKeralaकेरळBombsस्फोटकेpassengerप्रवासी