शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

मणिपूर मुद्द्यावरून राजकारण लाजिरवाणे; अमित शाह यांचा विरोधकांवर प्रतिहल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2023 06:43 IST

केंद्रीय मंत्री अमित शाह म्हणाले की, २००८ साली मनमोहनसिंग यांनी विश्वासदर्शक प्रस्ताव आणला. त्यावेळी काही खासदारांना कोट्यवधी रुपयांची लाच देण्यात आल्याचे व त्याद्वारे ते सरकार वाचविल्याचे चित्र लोकसभेने पाहिले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : मणिपूरमध्ये झालेल्या हिंसाचाराबाबत राजकारण करणे ही अतिशय दुर्दैवी व लाजिरवाणी गोष्ट आहे, असा आरोप केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी विरोधी पक्षांवर केला. ते म्हणाले की, ५८ निवारा वस्त्यांना सरकार जंगल ग्राम म्हणून घोषित करणार असल्याची २९ एप्रिल रोजी अफवा पसरली. त्यानंतर मणिपूरमध्ये असंतोष निर्माण झाला. 

शाह यांनी सांगितले की, मैतेई समुदाय हा आदिवासी समाज असल्याचा निकाल मणिपूर उच्च न्यायालयाने दिल्याने असंतोष आणखी वाढला. ३ मेपासून मणिपूरमध्ये झालेला हिंसाचार रोखण्यासाठी केंद्र सरकारने हालचाली सुरू केल्या होत्या. त्या राज्याचे डीजीपी, मुख्य सचिव बदलले, हवाई दलाच्या विमानाने त्या राज्यात ३५ हजार सैनिक पाठविण्यात आले होते.स्वत:ची सरकारे वाचविण्यासाठी भ्रष्टाचारात गुंतल्यानंतर विरोधी पक्षांच्या आघाडीचा खरा चेहरा सर्वांसमोर आला, असा आरोप शाह यांनी केला.

मोदी सरकारवर जनतेचा विश्वासकेंद्रीय मंत्री अमित शाह म्हणाले की, २००८ साली मनमोहनसिंग यांनी विश्वासदर्शक प्रस्ताव आणला. त्यावेळी काही खासदारांना कोट्यवधी रुपयांची लाच देण्यात आल्याचे व त्याद्वारे ते सरकार वाचविल्याचे चित्र लोकसभेने पाहिले आहे. यूपीएचे हे खरे चारित्र्य आहे. मोदी सरकारवर विरोधी पक्षांचा नसेल; पण जनतेचा विश्वास आहे. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर देशातील जनतेने खऱ्या अर्थाने ज्या नेत्यावर विश्वास दर्शविला ते नरेंद्र मोदी आहेत. त्यामुळेच संपूर्ण बहुमताने मोदी सरकार सलग दोनदा केंद्रात सत्तेवर आले. सुमारे ३० वर्षांनंतर संपूर्ण बहुमत असलेले सरकार अस्तित्वात आले. 

टॅग्स :Amit Shahअमित शाहParliamentसंसदMonsoon Session Of Parliamentसंसेदेचे पावसाळी अधिवेशन