लाजीरवाणे...भाजपा नेत्याची महिला नगरसेविकेला लाथाबुक्क्यांनी मारहाण

By Admin | Updated: October 21, 2015 16:42 IST2015-10-21T16:42:41+5:302015-10-21T16:42:41+5:30

भाजपा नेते नवीन पटेल यांनी दमणमधील महिला नगरसेविकेला लाथा बुक्क्यांनी मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे.

Embarrassed ... lathabukkki beat BJP's leader's corporator | लाजीरवाणे...भाजपा नेत्याची महिला नगरसेविकेला लाथाबुक्क्यांनी मारहाण

लाजीरवाणे...भाजपा नेत्याची महिला नगरसेविकेला लाथाबुक्क्यांनी मारहाण

ऑनलाइन लोकमत

दमण, दि. २१ -  भाजपा नेते नवीन पटेल यांनी दमणमधील महिला नगरसेविकेला लाथा बुक्क्यांनी मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. महिलांचा आदर व सुरक्षेची ग्वाही देणा-या भाजपामधील नेत्यानेच महिलेशी असे वर्तन केल्याने भाजपाची कोंडी झाली आहे.

दिवमधील भाजपा नेते नवीन पटेल आणि भाजपाचे अन्य पदाधिकारी  बैठकीनिमित्त एकत्र आले होते. हॉटेलच्या पॅसेजमध्ये नवीन पटेल यांनी महिला नगरसेविका सिंपल काटेला यांच्यावर आक्षेपार्ह विधान केले. सिंपल यांनी यासंबंधी पटेल यांना जाब विचारला. मात्र काही क्षणातच या दोघांमध्ये चक्क हाणामारी सुरु झाली. नवीन पटेल यांनी महिला नगरसेविका लाथा - बुक्क्यांनी मारहाण केली. अखेरीस उपस्थितांनी या दोघांना थांबवले. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झाला आहे. या मारहाणीप्रकरणी सिंपल यांनी पोलिसांकडे तक्रार केली असून दोघांमध्ये नेमका कशावरुन वाद होता हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही.  

 

Web Title: Embarrassed ... lathabukkki beat BJP's leader's corporator

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.