शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपासोबत युती तुटताच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या हालचालींना वेग; बैठका सुरू
2
विश्वचषक विजेत्या श्रीलंकन कर्णधाराला अटक होणार; अर्जुन रणतुंगा पेट्रोलियम घोटाळ्याप्रकरणी अडचणीत
3
SBI मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८३,६५२ चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीमचे डिटेल्स
4
Yamuna Expressway Accident: ७ बस, ३ कारचा थरकाप उडवणारा अपघात! चार प्रवाशांचा जळून मृत्यू
5
Stock Market Today: शेअर बाजाराच्या कामकाजाची मोठ्या घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स ३०० तर निफ्टी १०० अंकांनी घसरला
6
महायुती तुटली! पुण्यात भाजपा-NCP वेगळे लढणार; अजित पवार म्हणाले, "मी माझं सर्वस्व..."
7
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
8
Plane Crash Mexico Video: इमर्जन्सी लँडिंगआधीच विमान कोसळले; भयंकर अपघातात १० जण ठार
9
TV खरेदीचा विचार करत असाल तर आत्ताच करा, जानेवारीपासून किंमत वाढवण्याची तयारी; कारण काय?
10
आचारसंहिता लागण्यापूर्वी सत्ताधाऱ्यांची धावपळ; प्रकल्पाची उद्घाटने, भूमिपूजन अन् घोषणांचा सपाटा
11
धनुर्मासारंभ: ९ राशींना शुभ काळ, सूर्यकृपेने दुप्पट लाभ; पद-पैसा वाढ, धनुसंक्रांती ठरेल खास!
12
आजचे राशीभविष्य, १६ डिसेंबर २०२५: सरकारी कामात यश, अचानक धनलाभ; सुखाचा दिवस
13
कोट-पँट घालून फिरलात तर अटक अटळ! शिक्षा लेखी नाही, पण चाबकाचे फटकारे अन्...
14
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
15
क्रिकेटवेड्या देशाने मेस्सीवर जीव टाकला... पुढे? भारतीय फुटबॉलच्या विकासासाठी काय?
16
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
17
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
18
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
19
संपादकीय : यत्र, तत्र, पाकिस्तान सर्वत्र! ऑस्ट्रेलियातील हल्ल्याचे पाकिस्तानी कनेक्शन
20
शत्रूला दिसणारच नाही भारताचे लढाऊ विमान, जळगावच्या बहिणाबाई विद्यापीठाचे संशोधन
Daily Top 2Weekly Top 5

एलॉन मस्क यांचे वडीलही भारताच्या प्रेमात! अयोध्येतील राम मंदिरात येत रामललाचे घेतले दर्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2025 07:22 IST

दरवर्षी भारतात येणाऱ्या नागरिकांची संख्या दिवसेंदिवस वाढतेच आहे. त्यात जगातील मान्यवरांचाही समावेश आहे.

भारत हा साप, विंचू, हत्ती आणि गारुड्यांचा देश आहे, अशी बदनामी पूर्वी विदेशात केली जायची. कालांतरानं भारत ही काय चीज आहे, हे सगळ्यांना कळलं. भारतीय अध्यात्माने नंतर अख्ख्या जगाला वेड लावलं. जगभरातून आजही आत्मशांती आणि अध्यात्माच्या शोधात लोक भारतीय भूमीवर येत असतात. इथल्या अध्यात्माचे धडे गिरवून स्वत:च्या जीवनात शांती निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असतात. याच अध्यात्म आणि शांतीच्या शोधात दरवर्षी भारतात येणाऱ्या नागरिकांची संख्या दिवसेंदिवस वाढतेच आहे. त्यात जगातील मान्यवरांचाही समावेश आहे.

या लोकांना केवळ भारतीय अध्यात्माचंच नव्हे, तर इथल्या लोकजीवनाचं, इथल्या संस्कृतीचं, विविधतेचं आणि जगातल्या सर्वांत मोठ्या लोकशाहीचंही खूप आश्चर्य वाटतं. त्याचा अभ्यास करण्यासाठीही दरवर्षी हजारो अभ्यासक, संशोधक भारतात येऊन ठाण मांडतात.  

इलॉन मस्क हा जगातील सर्वांत श्रीमंत माणूस. ‘अवली’ म्हणून ते प्रसिद्ध असले तरीही त्यांच्या घराण्यालाही भारतीय अध्यात्माचं वेड आहे. इलॉन मस्क यांचे वडील एरोल मस्क यांनीही नुकतीच अयोध्येला हजेरी लावली. या भेटीत ते एकटेच नव्हते, त्यांची मुलगी अलेक्झांड्राही त्यांच्या सोबत होती. त्यांनी अतिशय भक्तिभावानं अयोध्येतील रामलल्लाचं दर्शन घेतलं. त्याच्यापुढे ते नतमस्तक झाले. भारतीय श्रद्धा आणि परंपरांविषयी पूर्ण आदर बाळगत एरोल मस्क यांनी कुर्ता-पायजमा या पारंपरिक वेशात राम मंदिराला भेट दिली आणि दर्शन घेतलं. त्याआधी त्यांनी हनुमान गढीवर जाऊन हनुमानाची विधिवत पूजाअर्चा केली. आरतीत भाग घेतला. अयोध्येतील पवित्रता, दिव्यता आणि संस्कृतीनं ते इतके प्रभावित झाले की, त्यांनी स्वत:ला भारतीय संस्कृतीचा प्रशंसक म्हणवून घेतलं. 

ते म्हणाले की, भारतीय संस्कृतीशी मी अतिशय चांगल्या पद्धतीनं परिचित आहे. अमेरिकेतही भारतीयांची संख्या खूप मोठी आहे. भारतीय लोकांचा स्वभाव खूप उदार आहे. ‘मानवता’ हे त्यांचं प्रमुख वैशिष्ट्य आहे आणि अमेरिकेतही मी पदोपदी त्याचा अनुभव घेतला आहे. जेव्हा जेव्हा मी भारतीय लोकांना भेटतो, तेव्हा तेव्हा एक सुखद अनुभूती आणि मन:शांती मी अनुभवली आहे. आता भारतात आल्यानंतर तर त्याची अधिक तीव्रतेनं प्रचिती मला आली. प्रसिद्ध मोटिव्हेशनल स्पीकर डॉ. विवेक बिंद्रा आणि इतरही अनेक नामवंत लोक त्यांच्यासोबत होते. एरोल मस्क यांचा दौरा केवळ व्यक्तिगत नसून, वैश्विक संबंध मजबूत करण्यासंदर्भातलं त्यांचं हे पाऊल आहे, असं त्यांचं म्हणणं होतं. 

ॲपलचे सहसंस्थापक स्टीव्ह जॉब्स यांचं भारत आकर्षणही नवं नव्हतं. त्यांनी तर मन:शांती आणि अध्यात्माच्या शोधात अनेकदा भारताला भेट दिली. १९७४मध्ये वयाच्या १९व्या वर्षी त्यांनी आपल्या बालपणीच्या मित्राला- टिम ब्राउनला एक हृदयस्पर्शी पत्र पाठवलं होतं. त्यात त्यांचं भारताचं आणि त्यातही कुंभमेळ्याविषयीचं आकर्षण ओतप्रोत भरलेलं होतं. या पत्रात स्टीव्ह जॉब्स यांनी म्हटलं होतं, भारताच्या कुंभमेळ्याला भेट देऊन तेथील अध्यात्मिक अनुभूती घेण्याची त्यांची तीव्र इच्छा आहे. त्यांचं स्वहस्ताक्षरात लिहिलेलं हे पत्र तब्बल ५,००,३१२ डॉलर्सना (सुमारे ४.३२ कोटी रुपये) विकलं गेलं होतं!

टॅग्स :World Trendingजगातील घडामोडीelon muskएलन रीव्ह मस्कAyodhyaअयोध्याRam Mandirराम मंदिर