शहरं
Join us  
Trending Stories
1
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
2
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
3
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
4
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
5
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
6
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
7
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
8
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
9
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
10
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
11
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
12
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
13
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
14
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
15
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
16
बाबो! क्रिती सनॉनने मुंबईत खरेदी केलं पेंटहाऊस, किंमत ऐकून पायाखालची जमीनच सरकेल
17
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
18
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
19
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
20
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य

१५ पाक रेंजर्सचा खात्मा

By admin | Updated: October 29, 2016 04:46 IST

पाकिस्तानी फौजांकडून आंतरराष्ट्रीय सीमा आणि नियंत्रण रेषेलगत होत असलेल्या हल्ल्याला तडाखेबाज उत्तर देत भारतीय सीमा सुरक्षा दलाने १५ पाकिस्तानी रेंसर्जचा खात्मा

जम्मू : पाकिस्तानी फौजांकडून आंतरराष्ट्रीय सीमा आणि नियंत्रण रेषेलगत होत असलेल्या हल्ल्याला तडाखेबाज उत्तर देत भारतीय सीमा सुरक्षा दलाने १५ पाकिस्तानी रेंसर्जचा खात्मा केला. पाकच्या काही चौक्याही उद्ध्वस्त केल्या. सीमेपलीकडून हल्ल्यासाठी वापरण्यात आलेली स्फोटके पाहता पाकिस्तानी लष्कर या रेंजर्सना मदत करीत आहे, असा दावा बीएसएफने केला. सीमेपलीकडून पाकिस्तानच्या निमलष्करी सैनिकांनी जम्मूतील नियंत्रण रेषेलगतच्या भागात केलेल्या उखळी तोफांच्या माऱ्यासोबत केलेल्या गोळीबारात दोन भारतीय नागरिक ठार, तर अन्य दोन जखमी झाले. गुरुवारी रात्रीपासून पाकिस्तानी सैनिकांनी उखळी तोफांसोबत गोळीबार करीत आंतरराष्ट्रीय सीमा, तसेच जम्मू, कथुआ, पूंछ व राजौरी जिल्ह्यातील नियंत्रण रेषेवरील भारतीय चौक्यांसोबत नागरी वस्त्यांना लक्ष्य केले. गेल्या २४ तासांत पाकिस्तानने शस्त्रसंधीचे १0 हून अधिक वेळा उल्लंघन केले. भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मिरात सर्जिकल हल्ला केल्यानंतर भारताने आंतरराष्ट्रीय सीमा आणि नियंत्रण रेषेसह सीमावर्ती भागात लष्करासोबत सीमा सुरक्षा दल तसेच निमलष्करी दलासोबत प्रांतीय सुरक्षा दलांना सतर्क करीत पाकच्या कुरापतींना तोडीस तोड उत्तर देण्याचे निर्देश दिले होते. (वृत्तसंस्था)जशास तसे उत्तर, पाकच्या काही चौक्या उद्ध्वस्त...- पाकिस्तानच्या बाजूने होणाऱ्या हल्ल्याला सीमा सुरक्षा दलाकडूनही ‘जशास तसे’ उत्तर दिले जात आहे. सीमा सुरक्षा दलाने केलेल्या उलट हल्ल्यात १५ पाक रेंजर्स ठार झाले असून, त्यांच्या काही चौक्याही उद्ध्वस्त करण्यात आल्या आहेत, असे सीमा सुरक्षा दलाचे अतिरिक्त महांसचालक अरुण कुमार यांनी सांगितले. - सीमेपलीकडून हल्ल्यासाठी वापरण्यात आलेले उखळी तोफगोळे (८० एमए आणि १२० एमएम) तसेच अन्य स्फोटकांनुसार पाकिस्तानी लष्कराची रेंजर्सला मदत असल्याचे उघड होते, असा दावाही त्यांनी केला.पलानवाला, मेंढरमध्ये दोन भारतीय नागरिक ठारपाकच्या तोफमाऱ्यात पलानवाल भागातील खौर पट्ट्यात एका नागरिकाचा मृत्यू झाला, तर आर. एस. पुरा भागात एक जखमी झाला. तसेच पूंछ जिल्ह्यातील मेंढर तालुक्यातील गोहलाद गावातील एक महिला ठार, तर अन्य एक जण जखमी झाल्याचे पोलीस आणि संरक्षण विभागाच्या प्रवक्त्याने सांगितले.खडा पहारा देत घुसखोरी उधळलीभारतीय सीमा सुरक्षा दलाचे जवान डोळ्यांत तेल घालून रात्रंदिवस खडा पहारा देत घुसखोरी उधळून लावण्यासोबत शस्त्रांनी चोख उत्तर देत आहेत. सीमा सुरक्षा दलाने गेल्या आठ दिवसांत कणखर पलटवार करून पाकिस्तानच्या १५ रेंजर्सचा खात्मा केला. गुरुवारी सायंकाळपासूनच पाकिस्तानी रेंजर्सनी जम्मू विभागातील कथुआमध्ये उखळी तोफा डागत गोळीबार सुरू केला. नंतर हिरानगर आणि सांबा भागालाही त्यांंनी लक्ष्य केले. शुक्रवारी रेंजर्सनी सीमा सुरक्षा दलाच्या २४ चौक्यांना लक्ष्य केले.३५ चौक्यांना केले लक्ष्य : गुरुवारी पाकिस्तानी सैनिकांनी आंतरराष्ट्रीय सीमा आणि नियंत्रण रेषेवरील सीमा सुरक्षा दल आणि लष्कराच्या ३५ चौक्यांना लक्ष्य केले होते. म्हणे, एकही जवान मेला नाही : १५ पाकिस्तानी रेंजर्सचा खात्मा झाला तरी, त्याचे पडसाद देशात उमटू नयेत, म्हणून पाकिस्तानने आमचा एकही सैनिक भारतीय गोळीबारात मरण पावला नाही, असा दावा केला आहे. दहशतवाद्यांची रानटी वृत्ती; शहीद जवानाचे अवयव कापलेकुपवाडा जिल्ह्यात मकहिल भागात नियंत्रण रेषेजवळ घुसखोरी रोखताना शहीद झालेल्या भारतीय जवानाचे अवयव कापून रानटी वृत्तीचे दहशतवादी पळून गेले. या घटनेला प्रत्युत्तर दिले जाईल, असेही सैन्य विभागाच्या प्रवक्त्याने म्हटले आहे. पळून जाणाऱ्या दशतवाद्यांपैकी एक जण ठार झाला.