शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

विमानतळाच्या रनवेवर येते मिरवणूक, वर्षांतून १० तास विमानांची उड्डाणे बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2022 11:34 IST

मंदिरातून निघालेली भाविकांची यात्रा म्हणजेच मिरवणुकीमुळे हे विमानतळ ५ तासांसाठी बंद ठेवण्यात येते

तिरुवअनंतपूरम - केरळच्या तिरुवअनंतपूरम येथील राष्ट्रीय विमानतळ हे कायमच गजबजलेलं असतं. मात्र, वर्षातून दोनवेळा हे विमानतळ ५ तासांसाठी बंद ठेवण्यात येतं. मंगळवारी सायंकाळी ४ वाजल्यापासून ते रात्री ९ वाजेपर्यंत हे विमानतळ बंद ठेवण्यात येणार आहे. त्यावेळी, विमानतळावरुन कुठल्याही विमानाचे उड्डाण झाले नाही. विशेष म्हणजे वर्षातून दुसऱ्यांदा ही प्रथा पाळली जाते. कारण, धार्मिक कारणास्तव, परंपरेनुसार हे विमानतळ वर्षातून १० तासांसाठी बंद ठेवण्यात येते. 

मंदिरातून निघालेली भाविकांची यात्रा म्हणजेच मिरवणुकीमुळे हे विमानतळ ५ तासांसाठी बंद ठेवण्यात येते. कारण, ही मिरवणूक एअरपोर्टच्या रनवेवरुनच निघते. ज्यामध्ये, हजारो भाविकांसह हत्तींचाही समावेश असतो. विशेष म्हणजे या मिरवणुकीला तब्बल ५ हजार वर्षांची परंपरा आहे. कोरोनापूर्वी म्हणजेच लॉकडाऊनच्या काही दिवस अगोदरही ही मिरवणूक मोठ्या उत्साहात निघाली होती. या उत्सवासाठी वर्षांतून दोनदा विमानतळ बंद ठेवण्यासाठी विमानतळाकडून एअरमेनला नोटीस पाठविण्यात येतं. त्यानुसार यंदा १ नोव्हेंबर रोजी हा उत्सव होत आहे. त्यासाठी, आज सायंकाळी ४ ते रात्री ९ वाजेपर्यंत येथील विमानतळावरुन कुठल्याही विमााचे उड्डाण किंवा लँडींग होणार नाही. या वेळांत ४ आंतरराष्ट्रीय उड्डाणांसह एकूण ६ विमानांचे उड्डाण थांबविण्यात येते. 

वर्षाच्या सुरुवातीला प्रथम मार्च-एप्रिल महिन्यात पेनकुनी उत्सवादरम्यान आणि दुसऱ्या ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये अराट्टू मिरवणूक काढण्यात येते. श्री भगवान विष्णू यांना पद्मनाभ स्वामी मंदिरातून पालखीत बसवून मिरवण्यात येते. विमानतळाच्या पाठीमागे असलेल्या शांघमुघम समुद्रकिनारी नेण्यात येते, तेथे भगवान विष्णूजींना स्नान करवण्यात येते. अशी परंपरा जोसापली जाते. दरम्यान, ही परंपरा ५ हजार वर्षांपूर्वीची असून १९३२ मध्ये येथील विमानतळ बांधण्यात आलं आहे. त्यामुळे, ही पंरपंरा जपत भाविकांच्या श्रद्धेचा आदर करत विमानतळाची सेवा वर्षातून दोनवेळा ५ तासांसाठी बंद ठेवण्यात येते. तेव्हाच यासंदर्भात परवानगी देण्यात आली आहे. 

टॅग्स :AirportविमानतळairplaneविमानKeralaकेरळ