सार्वजनिक गणेश मंडळांना कमी दराने वीजपुरवठा

By Admin | Updated: September 2, 2015 23:32 IST2015-09-02T23:32:00+5:302015-09-02T23:32:00+5:30

नागपूर : सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना घरगुती वापराच्या वीजदराच्या तुलनेत कमी दराने वीजपुरवठा केला जाणार आहे. प्रति युनिट ३.१७ रुपये अशा सवलतीच्या दराने बिल आकारण्यात येणार आहे. गणेशोत्सव मंडळांनी वीजसुरक्षेबाबत गांभीर्याने उपाययोजना क रून सवलतीच्या दरात लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.

Electricity supply to the public Ganesh mandals at a lower rate | सार्वजनिक गणेश मंडळांना कमी दराने वीजपुरवठा

सार्वजनिक गणेश मंडळांना कमी दराने वीजपुरवठा

गपूर : सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना घरगुती वापराच्या वीजदराच्या तुलनेत कमी दराने वीजपुरवठा केला जाणार आहे. प्रति युनिट ३.१७ रुपये अशा सवलतीच्या दराने बिल आकारण्यात येणार आहे. गणेशोत्सव मंडळांनी वीजसुरक्षेबाबत गांभीर्याने उपाययोजना क रून सवलतीच्या दरात लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.
घरगुती किंवा वाणिज्यिक वापराच्या विजेचे दर अधिक आहे. त्यामुळे गणेशोत्सवासाठी अनधिकृत वीजपुरवठा घेतल्यास तो आर्थिकदृष्ट्या महाग राहणार आहे. धार्मिक उत्सवासाठी अधिकृ त वीजपुरवठा घ्यावा. सार्वजनिक सुरक्षेला महत्त्त्व द्यावे. यासाठी गणेशोत्सव मंडळांना कमी दराने वीजपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सार्वजनिक गणेशोत्सवासाठी मंडप किंवा रोषणाई, देखाव्यासाठी लागणारी वीजव्यवस्था ही अधिकृत वीज कंत्राटदारांकडूनच करून घ्यावी. तातडीच्या मदतीची संभाव्य गरज लक्षात घेता सार्वजनिक मंडळांनी २४ तास सुरू असणाऱ्या महावितरणच्या मोफत क्र्रमांकावर संपर्क साधावा. तसेच मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी त्या त्या भागातील महावितरणच्या अभियंत्यांचे मोबाईल क्रमांक जवळ ठेवावेत, असे आवाहन महावितरणने केले आहे. (प्रतिनिधी)
चौकट...
सार्वजनिक सुरक्षा महत्त्वाची
-गणेशोत्सव मंडळांनी विद्युत तारांचा स्पर्श होणार नाही, याची खबरदारी घ्यावी
- वीजपुरवठा आणि जनरेटरसाठी स्वतंत्र न्यूट्रल घेणे आवश्यक आहे.
- जवळच्या वीज खांबावरुन वा वीजवाहिनीवरून आकोडे टाकून वीजपुरवठा घेऊ नये.
- वीजजोडणीसाठी चांगल्या दर्जाची तार किंवा केबल वापरावी.

Web Title: Electricity supply to the public Ganesh mandals at a lower rate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.