वीजग्राहक झाले ऑनलाइन
By Admin | Updated: December 20, 2014 22:27 IST2014-12-20T22:27:34+5:302014-12-20T22:27:34+5:30
तंत्रज्ञान : ७५ हजार ग्राहकांची वाढ; ५९ कोटींचा महसूल

वीजग्राहक झाले ऑनलाइन
त त्रज्ञान : ७५ हजार ग्राहकांची वाढ; ५९ कोटींचा महसूलनाशिक : महावितरणच्या ऑनलाइन वीजभरणा सुविधेला जिल्ात मोठा प्रतिसाद मिळत आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी ऑनलाइन सुविधेने वीजबिल भरण्याच्या संख्येत तब्बल ७५,२७४ ग्राहकांची वाढ झाली आहे.कमी त्रासात व विनाविलंब बिल भरण्याचा पर्याय ऑनलाइन बिलिंग सुविधेमार्फत महावितरणने उपलब्ध करून दिल्यानंतर या सुविधेचा लाभ घेणार्या ग्राहकांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. जानेवारी २०१४ ते नोव्हेंबर २०१४ या कालावधीत जिल्ातील एकूण ३,८१,४२५ ग्राहकांनी ऑनलाइन वीजबिल भरणा सुविधेचा लाभ घेत ५९.०२ कोटींचा महसूल महावितरणला प्राप्त झाला आहे. जानेवारी २०१३ ते डिसेंबर २०१३ या कालावधीत ३,०६,१५१ ग्राहकांनी ऑनलाइन बिलाच्या माध्यमातून एकूण ४१.३२ कोटी महसूल महावितरणला प्राप्त झाला होता. जिल्ात यावर्षी ऑनलाइन वीजबिल भरणा सुविधेचा फायदा घेणार्या एकूण ३,८१,४२५ ग्राहकांपैकी ३,२५,०७४ ग्राहक नाशिक शहर विभागातील, तर उर्वरित ५६३५१ ग्राहक ग्रामीण भागातील असून, त्यापोटी अनुक्रमे ४४.७३ व १४.२८ कोटींचा महसूल प्राप्त झाला आहे.महावितरणने डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू.महाडिसकॉम.इन या संकेतस्थळावर ऑनलाइन वीजबिल भरणा करण्याची सुविधा दिली आहे. सदर संकेतस्थळावर गेल्यावर कन्झुमर सर्विसेस याभागात जाऊन पे-बिलवर पर्यायवर क्लिक करून वीजबिलावर नमूद असलेला १० अंकी ग्राहकक्रमांक व ४ अंकी बिलिंग युनिट नंबर टाकून ऑनलाइनपद्धतीने ग्राहक वीजबिलाचा भरणा करू शकतात. सर्व लघुदाब ग्राहकांना क्रेडीट किंवा डेबीट कार्ड माध्यमातून किंवा नेट बँकिंगद्वारे वीजबिल भरणा करण्याची सुविधा उपलब्ध आहे. शिवाय या सुविधेचा फायदा घेण्यासाठी कुठलेही अतिरिक्त शुल्क आकारले जात नाही. बिल भरण्याच्या अंतिम तारखेच्या आतच वीजबिलाचा भरणा ऑनलाइन पद्धतीने होऊ शकतो. रांगेत तासंतास ताटकळत बसण्यापेक्षा विनाकटकट सोईस्कररित्या वीजबिल भरणा होत असल्याने ग्राहकांनी ऑनलाइन सुविधेस भरभरून प्रोत्साहन देत आहेत. पुढेही ग्राहकांनी असाच प्रतिसाद द्यावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.