आंध्र प्रदेशमध्ये वीज पडून २० जण ठार

By Admin | Updated: September 7, 2015 11:34 IST2015-09-07T09:30:14+5:302015-09-07T11:34:05+5:30

आंध्र प्रदेशमध्ये अंगावर वीज पडून २० जण ठार झाले आहेत

Electricity in Andhra Pradesh rises to 20 | आंध्र प्रदेशमध्ये वीज पडून २० जण ठार

आंध्र प्रदेशमध्ये वीज पडून २० जण ठार

ऑनलाइन लोकमत

हैदराबाद, दि. ७ - आंध्र प्रदेशमध्ये अंगावर वीज कोसळून २० जण ठार झाल्याची दुर्दैवी घटना काल रात्री घडली. राज्यातील अनेक जिल्ह्यात  मुसळधार पावसामुळे परिस्थिती गंभीर बनली असून अनेक भागात खूप पाणी साचले आहे. सर्वात जास्त मृत्यू (५) नेल्लौर  जिल्ह्यात झाले असून पूडीपार्थी गावात काल संध्याकाळी वीज कोसळून एका पिता-पुत्राचा मृत्यू झाला आहे. तसेच एक सुरक्षारक्षकही वीज पडून ठार झाला आहे. त्याशिवाय गुंटूर, गोदावरी व अनंतपूर जिल्ह्याताही पावासमुळे लोकांना प्राण गमवावे लागले आहेत. पावसाचा फटका बसलेल्या नागरिकांना स्थानिक प्रशासनातर्फे मदत करण्यात येत असून मुखमंत्री चंद्राबाबू नायुडू यांनी मृतांच्या कुटुंबियांना चार लाखांची मदत देण्याची घोषणा केली आहे. 

 

Web Title: Electricity in Andhra Pradesh rises to 20