शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

इलेक्ट्रीक स्कूटर्समध्ये आग : तपासासाठी समिती, मोठा दंडही आकारला जाणार; गडकरींची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2022 21:53 IST

गेल्या काही दिवसांमध्ये इलेक्ट्रीक वाहनांना आग लागण्याच्या (Electric Vehicle Fires Incident) अनेक घटना समोर आल्या होत्या.

गेल्या काही दिवसांमध्ये इलेक्ट्रीक वाहनांना आग लागण्याच्या (Electric Vehicle Fires Incident) अनेक घटना समोर आल्या होत्या. दरम्यान, आता या घटनांनंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Union Minister Nitin Gadkari) हे आता अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. अशा घटना दुर्देवी असून कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा आढळल्यास कंपन्यांना मोठा दंड ठोठावला जाईल असा इशाराही त्यांनी ट्वीटद्वारे दिला आहे.

अशा घटनांमध्ये सरकार तज्ज्ञ समितीचा अहवाल मिळाल्यानंतर आवश्यक ते आदेश जारी करेल. तसंच अशा प्रकरणांच्या चौकशीसाठी एका समितीची स्थापना केल्याची माहिती नितीन गडकरी यांनी गुरूवारी दिली. इलेक्ट्रीक वाहनांशी निगडीत काही दुर्घटना गेल्या दोन महिन्यांमध्ये समोर आल्या आहेत. यामध्ये काही जणांना आपले प्राण गमवावे लागले आणि काही जण जखमी झालेत हे अतिशय दुर्देवी आहे, असं त्यांनी ट्वीटद्वारे म्हटलं आहे. “आम्ही या घटनांच्या तपासासाठी आणि पुढील पावलं काय उचलावीत याच्या शिफारसींसाठी एका तज्ज्ञ समितीची स्थापना केली आहे. अहवाल सादर केल्यानंतर यासंदर्भात आवश्यक ते आदेश जारी केले जातील,” असंही त्यांनी सांगितलं. तसंच इलेक्ट्रीक वाहनांच्या गुणवत्तेसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या जातील. याशिवाय कोणत्याही कंपनीनं यात निष्काळजीपणा केला तर त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात दंड आकारला जाईल आणि सर्व खराब वाहनांना परत मागवण्यासंदर्भातही आदेश दिले जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीelectric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटरIndiaभारत