शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

पुन्हा राज्याचा दर्जा मिळेपर्यंत निवडणूक लढणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2020 04:45 IST

ओमर अब्दुल्ला यांचे प्रतिपादन : अधिकार नसलेल्या विधानसभेचा सदस्य व्हायचे नाही

श्रीनगर : राज्यघटनेच्या अनुच्छेद ३७० अन्वये जम्मू-काश्मीरला दिलेला विशेष दर्जा रद्द करून या राज्याचे दोन केंद्रशासित प्रदेशांत विभाजन करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयावर नॅशनल कॉन्फरन्सचे कार्यकारी अध्यक्ष ओमर अब्दुल्ला यांनी सोमवारी सडकून टीका केली आणि जोपर्यंत जम्मू-काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा पुन्हा बहाल केला जात नाही तोपर्यंत आपण विधानसभेची निवडणूक लढविणार नाही, असे जाहीर केले.

वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत ओमर अब्दुल्ला म्हणाले की, निवडणूक न लढविण्याचा माझा निर्णय ही धमकी नाही किंवा ते ‘ब्लॅकमेलिंग’ही नाही. मी नाराजीने असे म्हणतो असेही नाही. ज्या केंद्रशासित प्रदेशाच्या विधानसभेला काहाही अधिकार नाहीत त्या विधानसभेचा सदस्य होण्याची माझी इच्छा नाही, असा त्याचा सरळ अर्थ आहे. ते म्हणाले की, मी एका राज्याच्या विधानसभेचा नेता होतो व ती विधानसभा देशात सर्वात जास्त अधिकारसंपन्न होती. आता असणारी केंद्रशासित प्रदेशाची विधानसभा सर्वात अधिकारशून्य विधानसभा असेल. (वृत्तसंस्था)

जनतेसाठी काम करीत राहणारच्तुम्ही हा निर्णय घेण्यापूर्वी त्यावर पक्षात चर्चा केली का, असे विचारता ते म्हणाले की, हे माझे मत आहे व माझा निर्णय आहे. एखाद्याला इच्छा नसताना निवडणूक लढविण्याची बळजबरी कोणीही करू शकत नाही.

च्मात्र, निवडणूक लढविली नाही तर मी नॅशनल कॉन्फरन्स या पक्षाच्या माध्यमातून काश्मीरच्या जनतेसाठी यापुढेही काम करीत राहीन, असेही काश्मीरचे पूर्वी मुख्यमंत्री व केंद्रात वाजपेयी सरकारमध्ये मंत्री राहिलेले ५० वर्षांचे अब्दुल्ला म्हणाले.च्ते असेही म्हणाले की, काश्मीरचा राज्याचा दर्जा हिरावून घेताना मोठ-मोठी आश्वासने दिली गेली व नानाविध कारणे दिली गेली; पण त्यापैकी एकाचीही पूर्तता झालेली नाही किंवा त्यापैकी एकही कारण समर्पक असल्याचे दिसून आले नाही.च्ओमर यांचे वडील व पक्षाचे अध्यक्ष डॉ. फारुख अब्दुल्ला यांनीही रविवारी अशाच प्रकारची टीका केली होती व केंद्र सरकारने ‘विश्वासघाता’ने हिरावून घेतलेला राज्याचा दर्जा पुन्हा बहाल करून काश्मिरी जनतेचे मन जिंकावे, असे आवाहन केले होते.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरOmar Abdullahउमर अब्दुल्ला